Breaking
ब्रेकिंग

शिवपानंद शेत रस्त्यांचा व पेरू आंदोलनावर पारनेरचे तहसीलदार चांगलेच भडकले !

0 3 9 1 0 5

पारनेरचे तहसीलदार शिवकुमार अवळकंठे यांच्या अर्वाच भाषेची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार – शरद पवळे

अक्षराज :  वसंत रांधवण 

दि.२४ पारनेर (अ.नगर) : शिव पाणंद शेतरस्त्यांसह पाझर तलावांच्या दुरुस्त्यांसाठी शेतरस्ते पिडीत शेतकर्‍यांच्या ‘पेरुवाटप आंदोलना’ वेळी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठेवलेले पेरू वाटप आंदोलनाचा शेतमाल रस्यावर फेकला तहसीलदार शिवकुमार आवळकंठे आणि तहसील कर्मचाऱ्यांनी तुच्छतेची वागणूक दिल्याचा आरोप आंदोलनकर्ते सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी केला आहे.याबाबत पवळे यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी सप्तपदी अभियानातुन शिवपाणंद रस्ते खुले करण्यासाठी अवाहन केले असता पारनेर तालुक्यातुन सर्वाधिक शेतरस्त्यांचे अर्ज पारनेर तहसिलला देण्यात आले परंतु तहसिल प्रशासनाकडून अर्जांना केराची टोपली दाखावण्यात आली त्यामुळे वाट पाहून कंटाळून अखेर पुन्हा पारनेर तालुक्यातील गावोगावचे शिवपाणंद शेतरस्ते , पाझर तलावांसह पुरातन जलस्रोतांच्या दुरुस्तीसाठी व शेतकऱ्यांना सप्तपदीचे फसवे आमिष दाखवणारे अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी.
अन्यथा पुन्हा नव्याने उभ्या झालेल्या शिव पाणंद शेतरस्ते, पुरातन जलस्रोत पुनर्जिवन चळवळीच्या माध्यमातुन पारनेर तालुक्यातील शेतकरी पारनेर तहसिल कार्यालयात पेरु वाटप आंदोलन आज करत होते. यावेळी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक स्टॉल उभारून पेरू वाटप आंदोलन करण्यात आले. दरम्यान तहसील कार्यालय आवारात मुख्य प्रवेशद्वारावरच आंदोलन सुरू असल्याने तहसीलदार शिवकुमार आवळकंठे चांगलेच संतापल्याचे दिसून आले.
त्यांनी पेरू ठेवलेले कॅरेट्स हटवत आंदोलनकर्त्यांना चांगलेच सुनावत जे फळ वाटप करायचे ते आवाराच्या बाहेर जाऊन करा, इथे तमाशा घालू नका, १४४ कलम लागू आहे, केवळ दोन लोकांनी कार्यालयात येऊन तुमच्या मागण्यांचे जे काही निवेदन आहे ते द्या,तुमचे काम असतील ते करू पण अशा पद्धतीने कार्यालयात आंदोलन करता येणार नाही पोलिसांना कळवले तर अटक होईल असा दमच तहसीलदारांनी यावेळी भरला.
यावेळी पवळे यांच्यासह शेतरस्ते पिडित शेतकरी भाऊसाहेब वाळुंज, बाळासाहेब औटी, संतोष लोणकर,हौशीराम कुदळे, आदी शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार गणेश आढारी यांच्यासह पारनेर पोलिस स्टेशनला निवेदन दिले. दरम्यान शरद पवळे, यांनी तहसीलदार शिवकुमार अवळकंठे यांच्याकडून मिळालेल्या तुच्छता पूर्ण वागणुकीचा निषेध केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे