Breaking
क्रिडा व मनोरंजनदेश-विदेश

फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशन वर्ल्ड तर्फे गोवा कॅम्पचे आयोजन

0 3 9 0 9 6

फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशन वर्ल्ड तर्फे गोवा कॅम्पचे आयोजन

अक्षराज : महादेव चव्हाण

दि.३० गोवा : मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून कराटे ट्रेनिंगचे गोवा कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. फुनाकोशी शोतोकान कराटे – डो असोसिएशन ग्रँडमास्टर केविन फुनाकोशी (USA) मुख्य शाखा आणि इंडिया शाखा फुनाकोशी शोतोकान कराटे असोसिएशन वर्ल्ड – शिहान गणेश मरगजे (इंडिया चीफ) व चेअरमन सुप्रसिद्ध फिल्म ॲक्टर सुमन तलवार आहेत. शिहान गणेश मरगजे यांनी कराटे गोवा ट्रेनिंग कॅपचे आयोजन दि.२७/०४/२३ ते ०१/०५/२३ पर्यंत पाच दिवसाचे आयोजन केलेले होते. या दिवसांमध्ये कराटेच्या मुली / मुलांसाठी खास प्रशिक्षण दिले गेले वेपण चालवणे, मर्दानी शिवकालीन स्टिक चालवणे, तलवारबाजी, नान चाकू व स्टोनफा यासारखे प्रशिक्षण दिले गेले. याव्यतिरिक्त कराटे प्रशिक्षण अकीडो मध्ये सेल्फ डिफेन्स म्हणजेच बचाव करण्याचे ट्रेनिंग देण्यात आले. तसेच रायफल शूट ट्रेनिंग, स्विमिंग स्पर्धा, डान्स स्पर्धा, कॅम फायर त्याचबरोबर टुरिझम बीच व गोवा पर्यटन स्थळ या सर्व बाबीचे आयोजन करण्यात आले.

 या कराटे गोवा कॅम्प मध्ये सर्व क्लास एकत्र आल्याने अनेकांचे कौशल्य या कॅम्पमध्ये सर्वांना शिकता आले. याचेच पर्यावरण म्हणजे प्रत्येकाला आपल्या क्लासमध्ये अनेक ऍक्टिव्हिटी शिकवता येईल असाही फायदा या कॅम्पने झाला. या असोसिएशनच्या महाराष्ट्र मध्ये २४ शाखा आहेत. त्यामधील १२ शाखा मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये आहेत. आत्तापर्यंत या असोसिएशनने २५० पेक्षा जास्त ब्लॅक बेल्ट विद्यार्थी घडवले आहेत. अर्थातच प्रशिक्षण देण्याचे काम केलेले आहे. या कॅम्पसाठी सेन्साई हरीश कांबळे, सेन्साई हर्षद गडकरी, सेन्साई  मुरगेश देवेंदर, सेन्साई पंडित धायगुडे व सेन्साई मनी गौडा इत्यादींनी शिहान गणेश मरगजे यांच्या अध्यक्षतेखाली कॅम्पमधील सर्व कराटे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.

 शिहान गणेश मरगजे सरांनी “दैनिक अक्षराज’ शी बोलताना सांगितले की, कराटे आणि विविध ऍक्टिव्हिटी मुळे आम्ही तंदुरुस्त आणि परिपुर्ण विद्यार्थी घडवितो. याकरिता मुंबई, ठाणे, नवी मुंबई व इतर ठिकाणी खालील नंबरवर संपर्क साधावा. सिहान गणेश मरगजे. (८८९८११६४८४) स्वामी विवेकानंद स्कूल कुर्ला पूर्व व  यश पॅराडाईज ऐरोली सेक्टर – ८, सेन्साई हरीश कांबळे (९२२३३२६९३७) एन.जी.आचार्य स्कूल चेंबूर व किड्स प्लॅनेट खारघर, सेन्साई हार्षद गडकरी (८३६९६७४३७३) स्वामी विवेकानंद स्कूल चेंबूर (DBC) सेन्साई मुरगेश देवेंदर (९८९२५८६४५३) कुमुद विद्यामंदिर गोवंडी व बी.ए.आर.सी. देवनार गोवंडी,सेन्साई पंडित धायगुडे (९१६७२७०८६७) सेक्टर ९ कोपरखैरणे नवी मुंबई व तुलसी हाईट्स कामोठे,सेन्साई मनी गौडा (९२२३११८८००) हिंद विजय मंडळ सांगली व सावली बंगला सांगली, सेन्साई अमित भावे (७२०८३७७२८१) जॅक अँड जिल नेरूळ व लिटल लिडरस वडाळा, सेन्साई सुभाष भगत (७०२१०७०२७४) लोधा स्प्लेंडर ठाणे व संघवी हिल्स ठाणे, सेन्साई राजेश जगताप (८३५६८७७०४०) संत घाडगे महाराज कुर्ला पश्चिम, सेन्साई विनय धोत्रे (९३२४६४३९४५) रबाले गावदेवी व एम.आय.डी.सी. रबाले नवी मुंबई, सेन्साई विवेक सुर्यवंशी (९८१९७२७१६३) पोद्दार स्कूल भांडुप इत्यादी ठिकाणी संपर्क साधावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे