Breaking
ब्रेकिंग

माथेरानमधील वेस्ट प्लास्टिक गोडाऊन जळून खाक

0 3 9 1 0 5

माथेरानमधील वेस्ट प्लास्टिक गोडाऊन जळून खाक

अक्षराज : चंद्रकांत सुतार 

दि.१२, माथेरान :
 माथेरान येथील हुतात्मा स्मारक कम्युनिटी सेंटर बाजूला असलेले वेस्ट प्लास्टिक गोडाऊन ला  पहाटे  पाच च्या सुमारास आग लागल्याचे  सफाई कामगारांना लक्षात  आल्याने  त्यांनी आग विझविन्याचा प्रयत्न  केलां पण वेस्ट प्लास्टिक, पूट्टा  या मुळे आगीचा भडका, धूर  जास्त असल्याने प्राथमिक प्रयत्न निष्फळ ठरले, आग विझविण्यासाठी   फायर ब्रिगेडच्या  गाडीला बोलवण्यात आले. अथक प्रयत्नांनी तीन चार तासांनी आग विझविण्यात यश आले. आगीत जीवीत वित्त हानी झाली नसली तरी, आगीचे कारण रस्त्याबाजुला फेकलेल्या रेतीच्या  रिकाम्या पिशव्यामुळे आग  लागल्याचे माहिती समोर आली आहे, ह्या आगीत रूम मध्ये ठेवलेल्या वेस्ट प्लास्टिकचे  गट्ठे  पुर्ण पणे जळून नष्ट झाले आहे, आग विझविण्यासाठी नगरपालिका  स्वच्छ्ता विभाग कर्मचारी अन्सार  महापुळे, कैलास सोनवळे , विश्वास सातपुते, स्वच्छ्ता निरीक्षक नरेंद्र सावंत, उमेश लोखंडे प्रवीण शिंदे, अजिंक्य सुतार,  कर्मचारी ,महिलापुरूष वर्गाने मोठे परिश्रम घेतले.


 हुतात्मा स्मारक, आणि कम्युनिटी सेंटर परिसर डप्पिंगची  जागा बनल्याने ज्या हेतून ज्या वास्तू उभ्या केल्या आहेत त्या जागेच्या वास्तूची किंमत  स्वतः नगरपालिकेने केली आहे.  या बाबत राजकिय पक्ष ही मुग गिळून गप्प बसले आहेत, हे माथेरानकरांचे  दुर्दव्य,

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे