Breaking
नागरी समस्यामुंबई व कोकण विभाग

खार्डी गावातील तलावात आढळला मृत्यूदेह

0 3 9 1 0 5

खार्डी गावातील तलावात आढळला मृत्यूदेह

अक्षराज : विनोद वास्कर

दि.१३, दिवा (ठाणे) : दिवा येथील खार्डी गावातील निर्मल नगरी जवळ असलेल्या तलावात पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलांच्या जवानांनी मृतदेह तलावाबाहेर काढून शिळ -डायघर पोलिसांच्या ताब्यात दिला. घटनास्थळी डायघर पोलीस स्टेशनचे सीनियर पी.आय सचिन गावडे उपस्थित होते. त्यांनी कायदेशीर बाबीची पुर्तता करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला. तो एक दिवसापासून पाण्यात असल्याचा अंदाज असल्याची माहिती शिळ अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी पी .डी पाटील, खार्डी गावातले पोलीस पाटील परशुराम पाटील यांनी दिली. अग्निशमक केंद्राचे अधिकारी संपूर्ण काम आटपून फायर स्टेशनला परत आले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे