Breaking
ब्रेकिंग

महानगरपालिकामार्फत शहरात रिड्यूस, रियुज, रिसायकल केंद्र सुरु

0 3 9 1 0 5

महानगरपालिकामार्फत शहरात रिड्यूस, रियुज, रिसायकल केंद्र सुरु

अक्षराज : घनश्याम आंबोकर

दि.१९ मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकामार्फत प्लास्टिकसह जुन्या निरुपयोगी वस्तू संकलित करून त्याचा पुनर्वापर व पुनर्प्रक्रियेसाठी शहरात सहा ठिकाणी रिड्यूस, रियुज आणि रिसायकल केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. सदर केंद्र ही शहरात ६ ठिकाणी उभारण्यात येणार असून त्याचे उद्घाटन दिनांक २० मे २०२३ रोजी आमदार प्रताप सरनाईक, आमदार श्रीमती गीता जैन, आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले व स्वच्छ मिरा भाईंदरचे ब्रँड ॲम्बेसेडर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
महापालिकेने केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या मेरी लाइफ मेरा
स्वच्छ शहर अभियान ही योजना आखली आहे. शहर स्वच्छ राखण्यासाठी या उपक्रमाची
शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह प्लास्टिक वापर कमी करण्यात यश मिळेल. त्यानुसार महापालिकेने शहरात ६ ठिकाणी रिड्यूस, रियुज आणि रिसायकल केंद्र सुरू करण्याच्या जागा निश्चित केल्या आहेत. या केंद्रामध्ये शहरातील नागरिक त्यांच्याकडील वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे, जुनी भांडी, खेळणी, इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर निरुपयोगी वस्तू देऊ शकतात. RRR केंद्रांमध्ये जमा करण्यात येणाऱ्या निरुपयोगी वस्तूंचा पुनर्वापर केला जाणार असून प्रक्रिया करण्यायोग्य असलेल्या वस्तूंवर पुनर्प्रक्रिया करण्यात येणार आहे. उत्तन चौक (भूत बंगला), मॅक्सस मॉल, नवघर नाका, मिरा रोड स्टेशन, आयुक्त निवास जवळ व काशिमीरा उड्डाणपूलखाली रमाबाई प्रवेशद्वारजवळ ही केंद्रे २० मे ते ०५ जून २०२३ पर्यंत रोज सकाळी ७ वाजता ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. या केंद्रात शहरातील सामाजिक संस्था, इंटर्नचे विद्यार्थी, शहरातील जागरूक नागरिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर असे १० स्वयंसेवक निश्चित करण्यात आले आहेत. तरी २० मे ते ०५ जून २०२३ पर्यंत सुरू करण्यात येणाऱ्या या रिड्यूस, रियुज आणि रिसायकल केंद्रावर शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरातील, परिसरातील निरुपयोगी वस्तू गोळा करून मिरा भाईंदर महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक
दिलीप ढोले यांच्यावतीने करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे