Breaking
देश-विदेश

श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे अनुष्ठानास प्रारंभ

0 3 9 1 0 3

श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे अनुष्ठानास प्रारंभ

अक्षराज : वृत्तसंकलन

दि.०४ अयोध्या : संपूर्ण भारत देशात हिंदू धर्माचे दैवत असलेल्या प्रभू रामचंद्र जन्मभूमीचे भव्य मंदिर अयोध्येत होत असून, यासाठी अनेक भाविक मंडळाकडून स्वागत तर होतच आहे. हे मंदिर हिंदुस्थानातील एक मोठे भव्य दिव्य मंदीर असणार आहे. या ठिकाणी श्री सद्गुरू ग्रुप पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच ‌प्रत्येक जिल्ह्यातून पाच ब्राह्मणाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये यावेळी बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदार संघातील,४ व लवूळ गावातील १ ब्राह्मणाची निवड करण्यात आली होती. यामध्ये रोज आरती, पूजा, होम हवन आदी दैनंदिन धार्मिक विधी ४ जून पर्यंत चालणार आहे.

हा उपक्रम यापुढे भविष्यात कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास या प्रभु श्रीराम चंद्राच्या भव्यदिव्य मंदिराचे संरक्षण होण्यासाठी या अनुष्ठानाची आवश्यकता भावी काळासाठी अत्यंत गरज असते. असे सांगितले जाते. पुणे येथील श्री सद्गुरु ग्रुप यांच्या माध्यमातून अयोध्या येथे जाण्यासाठी यावेळी येथील या पाच ब्राह्मणांना योग आला. तसेच त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली. माजलगाव मतदारसंघातील वेदमूर्ती भागवताचार्य राजेंद्र महाराज गुंजकर, वेदमूर्ती भागवताचार्य बाळासाहेब जोशी (सादोळकर). वेदमूर्ती भागवताचार्य श्रीराम नवशिंदे (धारूर). वेदमूर्ती श्रीकांत देशमुख (लवूळकर). वेदमूर्ती विजय कुलकर्णी( वाघोरा). हे गेल्या २ मे, ते ४ जून २०२३, पर्यंत अयोध्या येथे हे पुरोहित अनुष्ठान सेवा करत असुन या सर्व अनुष्ठानाचे आयोजक श्री सद्गुरू पुणे यांच्यावतीने ही सेवा संपन्न होत असल्याने भाविकातुन या अनुष्ठान आयोजकाप्रती समाधान व्यक्त केले जात आहे.

4.3/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे