Breaking
ब्रेकिंगमुंबई व कोकण विभागराजकिय

सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

0 3 9 0 8 1

सुप्रिया सुळेंनी घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

अक्षराज : प्रतिनिधी

दि.०९, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना मिळालेल्या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज शुक्रवार, दिनांक ०९ जून रोजी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. ‘ पवार साहेब हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना काहीही झालं तर ती केवळ राज्याचेचे नव्हे तर देशाचं गृहखातंही जबाबदार असेल’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शकतेने चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. तसेच याप्रकरणी आपण केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच नव्हे तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनाही हे निवेदन करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे