Breaking
गुन्हेगारीपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, आज पारनेर बंद

0 3 9 1 0 5

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, आज पारनेर बंद

अक्षराज : वसंत रांधवण
दि.१२ पारनेर (अ.नगर) :
पारनेर तालुक्यातील पाबळ येथील वसीम सय्यद या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करून महाराष्ट्राची व छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. पारनेर पोलीस स्टेशन मध्ये संबंधित तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. हिंदूवादी संघटनेकडून या घटनेच्या निषेधार्थ पारनेर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांकडून खबरदारीच्या सुचना आणि कारवाईचा इशारा देण्यात आल्या. या दरम्यान वसीम सय्यदच्या पोस्टबाबत समाज माध्यमांवर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ संपूर्ण पारनेर शहर व्यवसायिक, व्यापारी सर्वांनी बंद ठेवल्याने सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अश्लील पोस्ट करणाऱ्या तरुणावर तात्काळ गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्याबाबत पारनेर येथिल हिंदूवादी संघटनांनी मागणी करत पोलीस स्टेशन समोर ठाण मांडले व तत्काळ गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी केली. यामध्ये तुषार औटी,आबा देशमुख, गणेश कावरे, अक्षय चेडे, ऋषी गंधाडे, स्वप्निल पुजारी,रायभान औटी,धीरज महांडूळे, सतीश म्हस्के, संभाजी मगर, अनिकेत औटी आदी उपस्थित होते.


यासंदर्भात फिर्याद संदिप चंदकांत कावरे यांनी दिली असून त्यात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारताचे दैवत व प्रेरणास्थान असुन त्यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वसीम बाबा सय्यद याच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हनुमान उगले करत आहेत.
शिवाजी महाराजांच्या संदर्भात समाज माध्यमांद्वारे आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या तरुणाने अळकुटी येथे येऊन माफी मागितली मात्र ग्रामस्थांनी केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट बाबत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला असून अळकुटीसह पारनेर तालुका बंद ठेवण्याचा निर्णयावर हिंदूवादी तरुण ठाम असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील विविध शहरात सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पारनेर पोलीस अलर्ट झाले असून कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखवतील असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारीत करू नये, असे आवाहन पारनेर पोलिसांनी केले आहे.


सामाजिक सलोख्याला बाधा येईल, कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखवतील, असा कोणताही मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारीत करू नये. तसे आढळून आल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील पाबळ येथील मुस्लिम तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी फिर्याद तात्काळ पारनेर पोलीस स्टेशनला दाखल करून घेण्यात आली आहे. संबंधित युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पारनेर तालुका हा कायदा सुव्यवस्था मानणारा तालुका आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.

  • संभाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक पारनेर
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे