Breaking
गुन्हेगारीपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंग

लाच घेतांना ३ लाचखोर पोलीस हवालदार जाळ्यात

येरवडा पोलिस ठाण्याचा कारभार

0 3 9 1 0 5

लाच घेताना लाचखोर 3 पोलीस हवालदार जाळ्यात

येरवडा पोलिस ठाण्याचा कारभार

अक्षराज : प्रणिल कुसाळे

दि. १२ येरवडा (पुणे) : अपघाती व्यक्तीची तक्रार घेण्यासाठी २० हजाराच्या लाचेची मागणी करुन १३ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यातील ३ पोलिस हवालदारांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने पकडले. जयराम सावळकर
राजेंद्र दीक्षित, विनायक मुधोळकर ( पोलीस हवालदार येरवडा पोलिस ठाणे) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे. सोमवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली आहे. धक्कादाय प्रकार म्हणजे दिवसा या प्रकरणी पैशाची मागणी वाढवत नाही म्हणून जयराम सावळकर यांनी फिर्यादीचे कॉलर धरून पोलीस स्टेशनच्या बाहेर काढण्यात आले होते. तक्रारदाराचा ट्रॅव्हल्स बिजनेस असून अपघाताचे गुन्हा दाखल करण्यासाठी 20 हजार ची लाज मागण्यात आली .

या तिघांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदारला येरवडा पोलीस ठाण्याकडून खूपच अपमानित वागणूक मिळाली असता तक्रारदार यांना रात्री फोन करून पैसे देण्यासाठी बोलवण्यात आले. त्याचवेळेस सदरचा प्रकार घडला. मध्यरात्री हवालदाराने समझोता (सेटलमेंट ) म्हणून हवालदाराने १३ हजाराच्या लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. त्यावेळी हवालदाराने लाज मागितलेले समोर आले. त्यानुसार पथकाने सापळा लावून या ३ पोलीस हवालदार रंगेहाथ १३ हजार रुपये घेताना पकडले. सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक श्रीमती शितल, जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भरत साळुंखे, पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, सहाय्यक फौजदार मुकुंद आयाचित, पोलीस शिपाई भूषण ठाकूर, पांडुरंग माळी, यांनी ही कारवाई केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे