Breaking
ब्रेकिंगमुंबई व कोकण विभागराजकिय

ईडीच्या निशाण्यावर आता ठाकरेंचे निकटवर्तीय

सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड 

0 3 9 1 0 5

ईडीच्या निशाण्यावर आता ठाकरेंचे निकटवर्तीय

सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड 

अक्षराज : प्रतिनिधी

दि.२१, मुंबई :    आज बुधवार, दिनांक २१ जून रोजी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीनं धाड टाकली आहे.  सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास ईडीचं पथक हे सूरज चव्हाण यांच्या चेंबुरमधील निवासस्थानी ही छापेमारी करण्यात आली आहे. के के ग्रँड या चेंबुरमधील इमारतीत ११ व्या मजल्यावर सूरज चव्हाण राहतात. पाच अधिकाऱ्यांचं पथक चव्हाण यांच्या घरी दाखल झालं आणि त्यांनी चौकशी सुरू झाली. कोरोना काळातील लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणी ही धाड टाकण्यात आली आहे.    

कोरोनाच्या काळात लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. कोविड सेंटर आणि वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. या प्रकरणी ईडी आज चौकशी करत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे