Breaking
ब्रेकिंगमुंबई व कोकण विभागराजकिय

१५ ठिकाणी मुंबईत ईडीचे छापे….

0 3 9 0 9 5

१५ ठिकाणी मुंबईत ईडीचे छापे….   

अक्षराज : प्रतिनिधी

दि.२१, मुंबई : करोना केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी हे छापे टाकण्यात आले असून शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे सुजीत पाटकर यांच्या मालमत्तेवरही छापा टाकण्यात आला आहे. याशिवाय एका सनदी अधिकाऱ्यांच्या ठिकाणावरही ईडीने छापा मारल्याचे समजते. सुजीत पाटकर यांच्यासह आणखी तिघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ईडीने हे छापे मारले आहेत. 

संजय राऊत यांचे मित्र सुजित पाटकर याप्रकरणी रडारवर आले असून करोना केंद्रातील कंत्राटाप्रकरणी सुजित पाटकर आणि अन्य तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनुसार आझाद मैदान पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट कागदपत्र सादर करणे, फौजदार विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमय्या यांच्या तक्रारीनुसार, याप्रकरणी ३८ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी लाईफ लाईन रुग्णालयाच्या व्यवस्थापन सेवेसह डॉ हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे