Breaking
कृषीवार्तापश्चिम महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात अवघी दीड टक्का पेरणी

शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

0 3 9 1 0 5

अहमदनगर जिल्ह्यात अवघी दीड टक्का पेरणी

शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

अक्षराज : वसंत रांधवण
दि.२७, अहमदनगर :
दोन दिवसांपासून नगरसह राज्यात पावसाला सुरुवात झाली. मात्र, जिल्ह्यात अद्याप पावसाला म्हणावा तसा जोर नाही. यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणीची टक्केवारी दीड टक्क्यांवरच आहे. जिल्ह्यात काही भागात दमदार पाऊस बरसला असला तरी पेरणी योग्य पावसाची प्रतिक्षा असल्याने शेतकरी वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. कृषी विभागाच्या नियोजनानूसार जिल्ह्यात खरीपाचे ४ लाख ४७ हजार हेेक्टर सरासरी क्षेत्र असून सोमवार (दि.२६) अखेर ४ हजार ६९६ हेक्टरवर पेरण्या झालेल्या आहेत. यात विहीर असणार्‍या बागायत आणि पाणी असणार्‍या भागात कपाशी लागवड आणि तूर, बाजरी, मका पिकाची पेरणी झालेली आहे.
नगर जिल्हा रब्बी हंगामाचा जिल्हा आहे. मात्र, काही वर्षापासून मान्सूनच्या पावसाचे प्रमाण जिल्ह्यात वाढले आहे. यामुळे खरीप हंगामचे चित्र बदले आहे. यंदा मात्र, परिस्थिती वेगळ आहे. मान्सूनपूर्व पावसाने चकवा दिल्यानंतर आणि मान्सूनच्या पावसाने हात आखडल्याने खरीपच्या पेरण्यांवर परिणाम झाला आहे. मागील आठवड्यात शनिवार (दि.२४) पासून पावसाला सुरू झाली.

अनेक ठिकाणी पाऊस झाला असला तरी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. विस्कळीत स्वरूपात आणि काही तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी पेरणीसाठी आणखी पावसाची प्रतिक्षा आहे. यामुळे जिल्ह्यात पेरणी टक्केवारी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अडखळलेली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या अवघा दीड टक्का पाऊस झालेला आहे. यात सर्वाधिक कपाशी पिकाची लागवड आहे. पाण्याची सोय असणार्‍या विहिर बागायत भागात ४ हजार ६ हेक्टरवर कपाशीची लागवड झालेली आहे. तर तूर, मका आणि बाजारी पिकाची नग्ण क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. शनिवारपासून पावसाने सुरुवात केलेली आहे. मात्र, अद्याप सर्वदूर मुसळधार अथवा पेरणीलायक मोठ्या पावसाची अद्याप प्रतिक्षा आहे.


बियणे बाजारपेठ अद्याप ठप्पच
जिल्ह्यात कृषी विभागाने खरीप हंगामाची जोरदार तयारी केलेली आहे. यासाठी खरीप पिकांचे बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्यात आलेले आहेत. जिल्ह्याच्या बियाणे बाजारपेठेतून शेतकऱ्यांनी काही प्रमाणात बियाणे खरेदी केलेले असले तरी अद्याप बाजारपेठेपासून लांब आहे. परिणामी गेल्या काही आठवड्यापासून ठप्प असणाऱ्या बियाणे बाजारपेठेला ग्राहक शेतकऱ्यांच्या प्रतिक्षेत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे