Breaking
नागरी समस्यामुंबई व कोकण विभाग

दरड कोसळून अख्खं गाव ढिगार्‍याखाली

५ ते ६ जणांचा मृत्यू, ७५ जणांना वाचवलं

0 3 9 1 0 5

दरड कोसळून अख्खं गाव ढिगार्‍याखाली

५ ते ६ जणांचा मृत्यू, ७५ जणांना वाचवलं

अक्षराज : विनोद वास्कर
दि.२०, रायगड :
रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील ईशाळ गडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका आदिवासी पाड्यावर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेककांवर काळाने घातला आहे. यामध्ये १२०हून अधिक लोक ढिगार्‍याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ४८ कुटुंब राहत होते. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे आहेत. तसेच एकूण ७५ जणांना सुखरूप पणे बाहेर काढण्यात यश आला आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून ६ किमी डोंगरात भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. येथे आदिवासी ठाकूर समाजाची घरी आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार या वाडीतील ९०% घरे ढिगार्‍याखाली गेली असून मोठी जिवंत हानी होण्याची भीती आहे.आता भूस्खलन होत असून आधार आणि पाऊस असल्याने बचाव कार्यात प्रचंड अडथळे येत असल्याने बचाव कार्य व काही वेळासाठी थांबण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा हे बचाव कार्य सुरू करण्यात आला आहे. शिवदुर्ग निसर्ग मित्र वेद सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदत कार्यात सक्रिय आहेत.
दुर्घटना झाल्यानंतर काही लोक घाबरून जंगलात पळाले आहेत. ते परतआल्यानंतरच वाडीतील नक्की किती जण या दरडीखाली अडकलेले असू शकतात याबाबतची नेमकी माहिती मिळेल. अस आपत्तीकालीन बचाव पथकाच्या एका सदस्याने सांगितले.दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन घटनास्थळावर दाखल झाले आहेत. पहाटेच मंत्री दादाजी भुसे यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे. मात्र सोसाट्याचा वारा व पाऊस यामुळे त्यांना वरपर्यंत जाता आलं नाही. पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे