Breaking
पश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमहाराष्ट्र

अरे वाह…सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती होणार डिजीटल

0 3 9 1 0 5

सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती होणार डिजीटल
अक्षराज : अजमेर शेख
दि.२०, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती डिजीटल होणार आहेत. केंद्र शासनाने ग्रामपंचायती डिजिटल करणेसाठी निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना UPI व QR कोड सुविधा मिळणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. जिल्हा परिषद मार्फत सर्व ग्रामपंचायतींना अदयावत करणे बाबत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना महाईग्राम Citizen Connect ॲपची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. राज्यात या प्रणालीचा सर्वाधिक वापर सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी केलेला आहे. या ॲपच्याद्वारे नागरिक घरबसल्या ग्रामपंचायत कर भरणा करू शकतात व भरलेली रक्कम स्वयंचलितपणे संबंधित ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये वर्ग होते. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ग्रामपंचायतींचे कामकाज आधुनिक बनविणे बाबत निर्देश देण्यात आलेले आहे. यास अनुसरुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी यांनी ग्रामीण भागातील सर्व नागरिकांना कर भरणा सुलभ होणे करीता ग्रामनिधीचे खात्यांना UPI व QR कोडची सुविधा उपलब्ध करुन घेण्याचे निर्देश दिलेले आहेत.

BREAKING NEWS

”त्या” दरड कोसळलेल्या गावी जीव वाचवायला गेले, अन स्वतःचाच जीव गमावला

आर्थीक व्यवहार पारदर्शक व अधिकाधिक डिजीटल होणे करीता आणि UPI व QR कोड प्रत्यक्ष वापरात आणने करीता जिल्हा परिषद मार्फत पंचायत समिती स्तरावर विशेष शिबीर आयोजित करण्याचे सुचना देण्यात आलेल्या आहेत. सद्यस्थितीत ग्रामपंचायतींचे स्वनिधी खाते व वेगवेगळ्या बँकेत अथवा सहकारी बँकेत असल्याने UPI व QR कोडची सुविधा उपलबध करणे अडचणीचे असल्याने सर्व ग्रामपंचायतीचे खाते एचडीएफसी बँकेत उघडण्यात येणार आहे. एचडीएफसी बँक मार्फत UPI, QR कोड, पेमेंट गेटवे, पॉस मशीन या सारख्या पेमेंटच्या सुविधा निशुल्क उपलब्ध होणार आहे. एचडीएफसी बँकेचे अधिकारी हे चालू आठवड्यापासुन पंचायत समिती येथे उपस्थित राहुन सर्व ग्रामसेवक व सरपंच यांना आधुनिक पेमेंट सुविधा बाबत मार्गदर्शन करणार आहेत व खाते उघडण्याची प्रक्रिया पुर्ण करणार आहेत. जिल्हा परिषद मार्फत तालुका निहाय प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले असुन ३१ जुलै, २०२३ पुर्वीच सर्व ग्रामपंचायतीचे खाते एचडीएफसी बँकेत काढण्यात येऊन QR कोड उपलब्ध होतील. असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले. UPI QR कोड सह इतर आधुनिक पेमेंट सुविधा उपलब्ध करुन देणे करीता सर्व ग्रामपंचायतीचे नमुना क्रमांक ९ अदयावत असणे गरजेचे आहे. नमुना नंबर ९ चे दि. ३१ जुलै, २०२३ पर्यंत अदयावत करणेचे सुचना देण्यात आलेल्या असुन याबाबत कामकाज वेळेत पुर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई प्रस्तावीत करण्यात येणार असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे