Breaking
नागरी समस्याब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबई व कोकण विभाग

दरडग्रस्त इर्शाळवाडीला जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची भेट

0 3 9 1 0 5

दरडग्रस्त इर्शाळवाडीला जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांची भेट

अक्षराज : राजेंद्र भगत

दि.२०, रायगड : रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूर नजिक इर्शाळवाडी परिसरात काल रात्री दरड कोसळून दुर्घटना झाली आहे.मन सुन्न करणारी हि घटना आहे. दरडीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश येत आहे. परंतु पाऊस सतत पडत असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी तातडीने आज इर्शाळ वाडीला भेट देऊन परस्थितीचा आढावा घेतला व तेथील स्थानिक नागरिकांची विचारपूस केली. यावेळी रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल डवले, NSUI चे रायगड जिल्हा अध्यक्ष कुणाल जाधव व इतर सहकारी त्यांच्या सोबत होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे