Breaking
पश्चिम महाराष्ट्र

मंत्र्यांच्या ग्वाहीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील ३१ हजार कांदा उत्पादकांच्या आशा पल्लवीत

0 3 9 1 0 5

मंत्र्यांच्या ग्वाहीमुळे अहमदनगर जिल्ह्यातील ३१ हजार कांदा उत्पादकांच्या आशा पल्लवीत

अक्षराज : वसंत रांधवण
दि.२१, अहमदनगर :
अहमदनगर जिल्ह्यात राज्य शासनाच्या कांदा अनुदान योजनेत ४७ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. तर ई-पीक नोंद सक्तीमुळे तब्बल ४० टक्के शेतकर्‍यांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे हे ३१ हजार शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार असल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत ई-पीक नोंद नसणार्‍या शेतकर्‍यांना कांदा अनुदान देण्याची ग्वाही दिल्याने जिल्ह्यातील ३१ हजार शेतकर्‍यांना त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, कांदा अनुदानासाठी पात्र असणार्‍या ४७ हजार शेतकर्‍यांचा ३५० रुपये प्रमाणे १०२ कोटी ७९ लाख रुपयांचा भरपाईचा प्रस्ताव पणन विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा सहकार विभागाकडून देण्यात आली.
उन्हाळ्यात नगर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च या कालावधीत कांदा विक्री करणार्‍या शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या मार्गदर्शनात कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून अनुदानासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. ३० एप्रिलअखेर जिल्ह्यात ७८ हजार ७५२ शेतकर्‍यांनी विहित नमुन्यात प्रस्ताव दिले होते. यात बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या ७५ हजार ९७०, खासगी बाजारात विक्री करणारे २ हजार ७३९ आणि नाफेडकडील ४३ शेतकर्‍यांचा समावेश आहे. प्राप्त या प्रस्तावांची छाणनी झाल्यानंतर बाजार समितीत कांदा विक्री केलेले ७५ हजार ९७० पैकी ३० हजार ५३६ तर खाजगी बाजारात कांदा विकलेले २ हजार ७३९ आणि नाफेडकडील ४३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. प्राप्त या प्रस्तावांची छाणनी झाल्यानंतर बाजार समितीत कांदा विक्री केलेले ७५ हजार ९७० पैकी ३० हजार ५३६ तर खासगी बाजारात कांदा विकलेले २ हजार ७३९ पैकी ४४९ शेतकरी अपात्र ठरविण्यात आले होते. शासनाने ई- पिक फेऱ्याची ऑनलाईन नोंद असल्याने किंबहुना त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सकारात्मक नसल्याने अशा ३१ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहणार असल्याची भिती होती. मात्र बुधवारी पणनमंत्री सत्तार यांनी कांदा अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांना १५ ऑगस्ट पासून त्यांच्या खात्यावर अनुदान देण्याच्या घोषणेसोबत ज्या शेतकऱ्यांची ई पिक पहाणीत कांदा पिकांची नोंद नाही. यामुळे अनुदानासाठी अपात्र ठरवलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची ग्वाही दिल्याने संबंधित शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे