Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबई व कोकण विभाग

बदलापूरचे बारवी धरण भरले ! नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0 3 9 1 0 5

बदलापूरचे बारवी धरण भरले ! कुठल्याही क्षणी विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२७, बदलापूर (ठाणे ) : ठाणे जिल्ह्यातील कल्याण,डोंबिवली,उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, या शहरांमध्ये काही दिवस जोरदार पाऊस पडतोय. तसेच ठाणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील समाधानकारक पाऊस झाला आहे. बदलापूर मधील बारावी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने बारावी धरण भरत आले आहे.
दरम्यान, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, भिवंडी, तालुका च्या तहसीलदारांना बारवी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी धरणाच्या पाण्याच्या पातळीबाबत पत्र दिले आहे. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाले आहे बुधवारी २६ जुलैला दुपारी चार वाजता पाण्याची पातळी ७०.५० मी. एवढी होती. बारवी धरणात पाण्याची मोठी आवक पाहता पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. बारवी धरणाची पाणी पातळी ७२.६० मी. दर गेल्यानंतर धरणाचे स्वयंचलित वक्रद्वारे दरवाजे आपोआप उघडून पाण्याचा विसर्ग सुरू होईल. तसेच पाणी पातळी ७२.६० मी. पेक्षा खाली गेल्यानंतर वक्रद्वारे दरवाजे आपोआप बंद होऊन पाण्याचा विसर्ग थांबेल. असं पत्रामध्ये म्हटलं आहे.

मनसेची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक !

सद्यस्थितीतील सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आम्ही उल्हास नदीला आलेल्या पुराने धरणातून पाण्याचा विसर्ग करणे शक्य होत नाही यामुळे धरणाच्या पाणी पाकीट झपाट्याने वाढ होत आहे या सर्व बाबींचा विचार करता धरणाची पाणी पातळी कुठल्याही क्षणी ७२.६० मी. जाऊन स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप उघडतील. आणि बारावी धरणातून बारावी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. अशा इशारा पत्रामार्फत देण्यात आला आहे. म्हणून बारावी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यात अस्नोली चांदप, चांदपपाडा,पिपळोली,सागाव,पाटीलपाडा,कारंद,चांदप,मोऱ्याचापाडा,चोण,रहाटोली, या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे