Breaking
पश्चिम महाराष्ट्र

पळशी येथील विहीरीमध्ये आढळले आई व दोन मुलांचे मृतदेह…

0 3 9 0 8 6

पळशी येथील विहीरीमध्ये आढळले आई व दोन मुलांचे मृतदेह…

अक्षराज : वसंत रांधवण
दि. ०६,पारनेर (अ. नगर) :

पारनेर तालुक्यातील नागापूरवाडी ( पळशी ) येथे शनिवार दि. ५/८/२०२३ रोजी दूपारी २: ४५ चे दरम्यान माका नामदेव बिचकुले या शेतकर्‍याचे विहीरीमधे लहान मुलीचे प्रेत पाण्यावर तरंगताना लालु कोळेकर राहणार पळशी व गांवकर्‍यांनी पाहीले.सदर घटनेची खबर लालु कोळेकर यांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशनला दिली. घटना समजताच पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पीएसआय शैलेंद्र जावळे,पोलीस हेड काॅन्स्टेबल प्रितम मोढवे,पोलीस काॅन्स्टेबल रविंद्र साठे,पोलीस काॅन्स्टेबल विवेक दळवी यांनी घटना स्थळाला भेट देत पाहणी केली.


प्राप्त माहीतीनुसार शनिवार दि.५ ऑगस्ट रोजी दूपारी २ : ४५ चे दरम्यान लालू कोळेकर यांचे यांनी नागापूरवाडी,पळशी येथील माका नामदेव बिचकुले यांचे शेतातील विहीरीमधे एका लहान मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. खबर मिळताच घटनास्थळी दाखल झालेले पोलीस,पळशीचे सरपंच प्रकाश राठोड यांनी ग्रामस्थांचे मदतीने लहान मुलगी नामे कांचन सोमा बिचकुले वय वर्ष ५ हिचा मृतदेह बाहेर काढत असताना,तिची आई बायडाबाई सोमा बिचकुले वयवर्ष २६ वर्ष हिचाही मृतदेह वरती पाण्यावर तरंगताना दिसला.मात्र मुलगा समाधान सोमा बिचकुले वय वर्ष २ याचा मृतदेह मात्र मिळुन आला नाही.ग्रामस्थ व पोलीसांनी अथक परीश्रम घेत आई बायडाबाई व मुलगी कांचन बिचकुले यांचे मृतदेह बाजेला बांधून, दोरांचे सहाय्याने विहीरीच्या पाण्याबाहेर काढले.मात्र लहान मुलगा समाधान याचा मृतदेह संध्याकाळपर्यंत सापडला नव्हता तो आज रविवार दि.६/८/२०२३ रोजी सकाळी ७ वाजता विहीरीत सापडला. घटनास्थळी पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस टिम व ग्रामस्थ मृतदेह शोधण्याचे काम करत आहेत. आत्महत्याचे कारण गुलदस्त्यात? टाकळीढोकश्वर येथिल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन सुरू असुन घटनेचे नेमके कारण समजले नाही. मात्र प्रथमदर्शनी हि आईने दोन मुलांसह केलेली आत्महत्या असावी असेच दिसुन येते.आत्महत्येचे कारण समजले नाही.पूढील तपास पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली पीएसआय शैलेंद्र जावळे,पोलीस हेड काॅन्स्टेबल प्रितम मोढवे,पोलीस काॅन्स्टेबल रविंद्र साठे,पोलीस काॅन्स्टेबल विवेक दळवी हे करत आहेत.

2/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे