Breaking
कृषीवार्तापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

कृषी कन्यांकडून डिजिटल अँपची नागरिकांना माहिती

0 3 9 1 0 5

कृषी कन्यांकडून डिजिटल अँपची नागरिकांना माहिती
अक्षराज : प्रतिनिधी
दि.२० माळशिरस (सोलापूर) : माळशिरस तालुक्यातील संगम (ता. माळशिरस) येथे महात्मा- फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अकलूज च्या रत्नाई कृषि महाविद्यालया तर्फे ग्रामस्थांना डिजिटल अँप संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील रत्नाई कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम एकतपुरे तसेच प्रा. एम. एम चंदनकर, प्रा. एच व्ही कल्याणी तसेच प्रा यांच्या मार्गदर्शनानुसार कृषि कन्या साक्षी सोनवणे, प्रियंका काळदाते पाटील गितांजली ढेकळे, वनश्री सुतार, साक्षी घाडगे, पूजा सलगर, गौरी. कुबेर, प्रियंका कोकरे, वर्षा गलंडे यांनी या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी कृषी मैत्रिणींनी शेतकऱ्यांना डिजिटल अँप चे मार्गदर्शन केले.

यामध्ये कृषि कन्यांनी माय एपीएमसी हा शेतकऱ्यांना असलेला अँप मोबाईल मधे डाऊनलोड कसा करावा, त्याचा वापर कसा उपयुक्त आहे तसेच त्याचे होणारे फायदे याबद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली तरी शेतकऱ्यांनी त्वरित हा अँप स्वतःच्या मोबाईल मधे डाऊनलोड करून त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. या उपक्रमाप्रसंगी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थिती नोंदवली. त्याबद्दल कृषी कन्या साक्षी सोनवणे यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे