Breaking
पश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमहाराष्ट्र

लोणी विकास सेवा सोसायटीमध्ये आर्थिक गैरव्यवहार ?

0 3 9 1 0 3

लोणी विकास सेवा सोसायटीमध्ये आर्थिक गैरव्यवहार व अफरातफरी बाबत संचालक व सभासदांची सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार

अक्षराज : धर्मेद्र वर्पे
खंडाळा (सातारा) :
लोणी विकास सेवा सोसायटीमध्ये सत्ताधारी चेअरमन व संचालक यांनी संगनमताने तब्बल १ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा अपहार केले बाबत संबंधितांवर जाणीवपूर्वक आपल्या हितसंबंधितांना फायदा पोहोचवण्याचे हेतूने संस्थेच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरले प्रकरणी चौकशी होऊन योग्य ते कायदेशीर कारवाई करीत आर्थिक गुन्हा दाखल करण्याचे मागणीसाठी संस्थेचे संचालक व सभासदांनी सहाय्यक निबंध खंडाळा यांचेकडे समक्ष भेटून तक्रार अर्ज दिला आहे. तक्रार अर्जाच्या प्रती सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, सहकार आयुक्त पुणे,जिल्हा निबंधक सातारा यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लोणी विकास सेवा सोसायटी ही लोणी गावचे कार्यक्षेत्रात असून संस्थेचे एकूण ३५० सभासद आहेत. संस्थेचे स्वतःचे गोडाऊनसाठीचे इमारत असून २०१९ मध्ये झालेल्या मासिक सभेच्या ठरावानुसार सदर गोडाऊन मे व्हीसीडी इंटरप्राईजेस या कंपनीचे भागीदार ज्ञानेश्वर जगदेव कदम व विक्रम देविदास कदम यांना अनामत रक्कम रुपये २५००० व मासिक वाढे रक्कम रुपये ३५०० देण्याचे बोलीवर १० वर्षासाठी नोंदणीकृत कराराने देणे बाबत ठराव झाला होता. सदर भागीदार ज्ञानेश्वर जगदंब जगदेव कदम यांची आई शोभा जगदेव कदम या त्यावेळी संस्थेमध्ये संचालक होत्या तर विक्रम देविदास कदम यांचे वडील देविदास जगन्नाथ कदम हे सध्या विद्यमान चेअरमन आहेत सह दुय्यम निबंधक खंडाळा यांचे कार्यालयात दस्त नोंदणी क्रमांक २५४९/२०१९ अन्वये सदर भाडेपट्टा करार नोंदविण्यात आला होता. त्यावेळी करारासाठी व्हीसीडी एंटरप्राइजेस यांनी दुय्यम निबंधक कार्यालयास आवश्यक मुद्रांक शुल्क व नोंदणी सुद्धा भरली नसल्याचे समजते. नोंदणीकृत कराराने इमारतीचा ताबा घेऊनही केवळ सत्ताधारी संचालकांचे हितसंबंधित असल्याकारणाने आजतागायत एक रुपयाही जमा न केल्याचे माहिती असूनही विद्यमान चेअरमन श्रीनिवास कदम व व्हाईस चेअरमन तानाजी बाबुराव जगताप यांनी घाईगडबडीत सभासदांना विश्वासात न घेता २०२२ मध्ये मासिक सभेत सदरचा भाडेकरारनामा रद्द करणे बाबत ठराव घेतला. विद्यमान चेअरमन व व्हाईस चेअरमन यांनी संस्थेच्या आदर्श उपविधी मधील तरतुदींची तसेच सहकार कायद्यातील कलमांची पायमल्ली केली आहे.

सदर प्रकरणी पडदा टाकण्यासाठी सत्ताधाऱ्यां च्या मदतीने विसिडी इंटरप्राईजेस यांनी १८/०३/२०२० रोजी भाडेकरार रद्द करण्याबाबत दिलेले पत्र बोगस असून पत्रावर संस्थेची पोहोच नाही किंवा २०२२.पर्यंतच्या कोणत्याही वार्षिक सर्वसाधारण सभेत या संबंधाने कोणताही ठराव झाला नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.संस्थेच्या इमारतीचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करून संस्थेचे केलेले आर्थिक नुकसान हा संस्थेच्या पैशांचा गैरवापर व आर्थिक गुन्हा असल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लोणी विकास सेवा सोसायटी संचालक सभासदांनी सहाय्यक निबंध खंडाळा यांचेकडे केलेल्या तक्रारीत केली आहे.यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांनी वैयक्तिक हितसंबंधितांसाठी सहकारी संस्था मोडीत काढणाऱ्या दोषी पदाधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी तक्रारदार सागर भानुदास कदम यांचे कडील रेशन दुकान काढून घेण्याची धमकी देणाऱ्या संचालक व पदाधिकाऱ्यांचाही निषेध करीत त्यांचे वर कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सभासदांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. इतर प्रकरणांप्रमाणे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची भावना सभासदांनी व्यक्त केली. निवेदन देताना शिवसेना सातारा जिल्हा समन्वयक रामदास कांबळे,अँडव्होकेट भारत कदम, सागर भानुदास कदम, सागर पोपट कदम, धर्माजी कदम, गुलाब मोरे, जयश्री भोसले, रमेश कदम, भास्कर कदम, सुनील जगताप, बाळकृष्ण कदम, योगेश ननावरे यांचे सह अनेक सभासद उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे