Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्र

शेळका धानोरा परिसरात आढळला अज्ञात मृतदेह

0 3 9 1 0 5

शेळका धानोरा परिसरात आढळला अज्ञात मृतदेह

अक्षराज : सतीश तवले

दि.२९ कळंब (उस्मानाबाद) : शेळका धानोरा परिसरामध्ये दि.२८ रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास मोहा-कळंब रस्त्याच्या बाजूला सडलेल्या अवस्थेत मृतदेह रोडवरील ये जा करणाऱ्या लोकांना मृतदेहाचा दुर्गंधी आल्यामुळे त्याच्याकडे लक्ष गेल्यानेआढळून आला.

त्यांनी त्वरित कळंब पोलीस स्टेशनमध्ये कळविले असता कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांनी व इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व रात्री १० च्या सुमारास तपास चालू असताना तपासामध्ये मृतदेहाची ओळख पटू शकली नाही व पुढील तपास कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

मयताचे वर्णन –

अज्ञात मयत इसम वय अंदाजे 36 वर्ष ते 40 वया चे अंगात फिकट गुलाबी रंगाचा शर्ट ज्याच्या खिशावर आकाश असे टेलर चा लोगो असलेला, गजगा रंगाची पँट, कंबरेला चामडी बेल्ट, निळ्या रंगाची बनियन, खिशात चेक्स चा हातरूमाल अश्या वर्णनाचे अनोळखी पुरुष अंदाजे वय 36 -40 वर्ष वयाचे कळंब ते मोहा जाणारे रोडवर शेळका धानोरा शिवारातील लिलावती तुकाराम शेळके रा. शेळका धानोरा यांचे शेताजवळ रोडच्या कडेला पडलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुष अज्ञात कारणाने मयत
कोणाच्या ओळखीचे किंवा त्याबाबत उपयुक्त माहिती असेल तर पीएसआय चाटे-८८८८८३२४२९ /८६६८२३७५८७ या क्रमांकावर किंवा पोलीस ठाणे कळंब येथे संपर्क साधावा.

5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे