Breaking
कृषीवार्तापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

भोर तालुका बौद्धजन संघ या संस्थेचा ८.वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

0 3 9 0 8 4

भोर तालुका बौद्धजन संघ या संस्थेचा ८.वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

अक्षराज : सागर खुडे

दि.०४ भोर (पुणे) : भोर तालुका बौद्धजन संघ रजि.कुर्ला मुंबई ही संस्था ३ सप्टेंबर रोजी ८व्यां वर्षात पदार्पण केले आहे. आणि याचे औचित्य साधत या ८व्यां वर्धापन वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष- एकनाथ रामचंद्र गायकवाड आणि उपाध्यक्ष किरण महादेव गायकवाड यांनी भोर तालुक्यातील मुंबई, पुणे आणि बाहेरगावी स्थित असलेल्या समाज बांधवांना संस्थेच्या वर्धापन दिन सोहळ्यास आमंत्रित केले होते.

त्यामध्ये संस्थेच्या सदस्यांच्या आणि समाज बांधवांचा कि ज्यांनी ज्यांनी विविध क्षेत्रात आपली उल्लखेनीय कामगिरी केली, ज्यामध्ये उच्चपदस्थ, उच्चशिक्षित, उद्योजक, सरपंच,तलाठी, ग्रामसेवक तसेच सामाजिक,शैक्षणिक,राजकीय अशा सर्व विविध क्षेत्रांत काम करून एक वेगळा ठसा उमटविला, त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार प्रदान करून गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये संस्थेच्या सर्व सभासदांचा आणि समाज बांधवांचा यथोचित सत्कार सन्मान सोहळा कार्यक्रमाच अतिशय स्तुत्य असं आयोजन करण्यात आले.

जलनायक स्व.विजयराव मोकाशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपस्थित राहण्याचे आवाहन

सदर पुरस्कार प्रदान गुणगौरव सोहळ्याच्या समारंभाप्रसंगी  भोर तालुक्यातील नवनाथ सयाजी कदम(किकवी), सतिश गायकवाड (भोर भोलावडे) कश्यपदादा साळुंखे (दापेघर), अर्जुन शेलार (नेरे), दत्तू गणपत यादव (नाटंबी), रामचंद्र रणखांबे (भोलावडे), राजन घोडेस्वार (भोर),अमर माने (शिंद), सुनंदा गायकवाड (महुडे), बाळासाहेब अडसूळ (पिसावरे), दिपक  दिनकर गायकवाड (महुडे), अविनाश गायकवाड (आपटी), महेंद्र संकपाळ (कोंढरी), महेंद्र साळुंखे (संगमनेर), सुनील गायकवाड (कासुर्डी), अशोक आबा शेलार (देगाव), दत्तात्रय कांबळे, मयूर बापू गायकवाड (महुडे), अशोक आबा शिंदे (पसुरे), सुनील धर्मा मोरे (करंजगाव), आनंदा सातपुते (म्हसर), किरण रणखांबे (भोलावडे), सतिश निवृत्ती गायकवाड (भाटघर- सांगवी), डॉक्टर स्वप्नील सर्जेराव कांबळे (वडतुंबी), अँडव्होकेट प्रीती भालेराव आदि मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी बोलतं असताना या संस्थेच्या सर्व चमकणाऱ्या रत्नांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे उद्गार गायकवाड यांनी काढले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे