Breaking
आरोग्यनागरी समस्यापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

दुष्काळाकडे सरकारचे सोयीस्कर दुर्लक्ष – सुजित झावरे

जनावरांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार

0 3 9 0 8 1

दुष्काळाकडे सरकारचे सोयीस्कर दुर्लक्ष – सुजित झावरे

जनावरांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार

अक्षराज : वसंत रांधवण

दि.१९ पारनेर ((अ.नगर) : सप्टेंबर महिना संपत आला आहे. मात्र अजूनही बळिराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. यापूर्वी २००३ साली दुष्काळ पडला होता. त्यावेळी शासनाने तातडीने पावले उचलत जनावरांच्या चारा छावणी, चारा डेपो यासह आवश्यक उपाययोजना केल्या होत्या. मात्र यावेळी वेळोवेळी निवेदने देऊनही प्रशासनाला त्याचे गांभीर्य नाही. एकूणच दुष्काळाकडे सरकारचे सोयीस्कर दुर्लक्ष आहे. तातडीने दुष्काळ जाहीर न केल्यास जनावरांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी दिला आहे.

वासुंदे (ता. पारनेर) येथे शेतकऱ्यांशी झावरे यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, चारा, पाण्याच्या टंचाईमुळे पशुधन कसे वाचवायचे,हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे. अशा कालावधीत सरकारने इतर सर्व बाबींचा खर्च रद्द करावा. आज राज्यात सगळ्यात जास्त दुष्काळाला महत्त्व देऊन उपाययोजना करणे गरजेचे असताना तसे होताना दिसत नाही. शासनाला दुष्काळाचे गांभीर्य नाही. हे यावरून लक्षात येते, असेही ते म्हणाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे