Breaking
नागरी समस्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमहाराष्ट्र

अतिवृष्टीने खानूत (वेल्हे) येथे शेतकऱ्याचे घर जमिनदोस्त

एका वासराचा मृत्यू,अन्नधान्याची नासाडी ; लाखो रूपयांचे नुकसान

0 3 9 1 0 5

अतिवृष्टीने खानूत (वेल्हे) येथे शेतकऱ्याचे घर जमिनदोस्त

अक्षराज : धर्मेंद्र वर्पे

दि.०१ वेल्हे ( पुणे) : पानशेत विभागातील खानू गावातील राघू काळू ढेबे या शेतकऱ्याचे मध्यरात्रीला घर कोसळले. यात शेतकरी व त्याचे कुटूंब थोडक्यात बचावले असून एका वासराचा मृत्यू झाला आहे.तर पाच ते सहा जनावरे घराच्या ढिगाऱ्याखाली आडकले होते.त्यात जनावरे गंभीर जखमी झाले आहेत.याचबरोबर वर्षभर साठवून ठेवलेले धान्य भिजून चिखल झाले असून त्याची नासाडी झाली आहे. सर्वत्र सध्या मुसळधार पाऊस पडत असून याचा फटका ग्रामीण भागातील कुडा-मेडीचे घरे असणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे.राघू ढेबे या शेतकऱ्याचे घर कुडा-मेडीचे व छप्पर केंबळाच्या गवताचे आहे. पावसाचा जोर जास्त असल्याने कुडा मेडीवर वसलेले घर कोलमडून जमिनदोस्त झाले.यात शेतकऱ्याचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.

ऐन पावसाळ्यात डोक्यावरचे छप्पर गेल्याने ढेबे कुटूंबावर मोठे संकट कोसळले असून उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.
दरम्यान या प्रकारची माहीती तहसिलदार दिनेश पारगे व पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली असून तहसिलदार यांनी पंचनामा साठी तलाठी यांना सुचना दिल्याने तलाठी घटनास्थळी पोहचले आहेत.

प्रतिक्रिया :

ही घटना मध्यरात्रीस घडली असून यात शेतकरी सुदैवाने वाचले आहेत.शेतकऱ्याचे लाखो रूपयाचे नुकसान झाले असून प्रशासनाला माहीती दिली आहे.लवकरात लवकर या शेतकऱ्याला शासनाने मदत करावी.

  • संतोष कोकरे,माजी सरपंच खानू

प्रतिक्रिया :

पावसाचे प्रमाण जास्त असल्याने अशा घटना घडत आहे.माहीती मिळताच स्थानिकांच्या मदतीने पीडीत शेतकऱ्याला ताबोडतोब मदत केली.संबंधित प्रशासनाला कळावले आहे.

  • विलास कोकरे, पोलीस पाटील खानू
1/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे