Breaking
आरोग्यनागरी समस्यामहाराष्ट्रमुंबई व कोकण विभागशिक्षण

ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी उकाड्याने हैराण

वर्गांमध्ये फॅन, वर्गात वीजपुरवठा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल...

0 3 9 1 0 5

ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी उकाड्याने हैराण

वर्गांमध्ये फॅन, वर्गात वीजपुरवठा नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल…

अक्षराज : विनोद वास्कर

दि.१४, कल्याण (ठाणे) : मराठी शाळा वाचाव्यात त्यांचे संगोपन व्हावे. अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र प्रत्यक्षात ठाणे जिल्हा परिषदेच्या दहिसर येथील विद्यार्थ्यांना उकाड्याने प्रचंड ग्रासले आहे. वर्गांमध्ये वीजपुरवठा नसल्याने फॅन किंवा अन्य कोणत्याही प्रकारची उपकरण नाहीत. त्यामुळे शाळेत वीज मीटर आहे मात्र कनेक्शन नसल्याने विद्यार्थ्यांना उन्हाच्या उकाड्याच्या झळांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गेल्या कित्तेक महिन्यांपासून वर्गांतील वीज कनेक्शनची प्रतीक्षा लय शाळेला अंतर्गत वीज कनेक्शन कधी मिळणार असा प्रश्न सध्या विद्यार्थाना पडला आहे.

कल्याण ग्रामीण भागात असलेल्या १४ गावातील सर्वाधिक पटसंख्या असलेल्या दहिसर गावातील ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेचे मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ठाणे जिल्हा परिषदेकडून बी इमारतीचे बांधकाम दिलेल्या ठेकेदाराला वीज कनेक्शन बाबत कोणत्याही प्रकारची अट दिलेली नसल्याने त्याने वर्ग खोल्यांमधील वीज कनेक्शन करून दिलेले नाहीत. दहिसर येथील जिल्हा जिल्हा परिषद शाळेत एकूण २०९ विद्यार्थी असून सहा वर्गांमध्ये वीज कनेक्शन करून तेथे विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. मात्र ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून १४ गावातील शाळांकडे दुर्लाक्ष केलं जात असल्याने त्याचा सर्वाधिक फटका हा विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. या उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कोणीही पुढाकार घ्या ,मात्र शाळेतील अंतर्गत वीजपुरवठा विद्यार्थ्यांना सुरळीत करून द्या अशी मागणी सध्या विद्यार्थी करत आहे. त्यामुळे हे काम करायला ठाणे जिल्हा परिषदेला कधी मुहूर्त सापडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

2/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे