Breaking
कृषीवार्तानागरी समस्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमहाराष्ट्र

राजगड सहकारी साखर कारखाना धुरांडी पेटण्याची अनिश्चितता : कुलदीप कोंडे

0 3 9 1 0 5

राजगड सहकारी साखर कारखाना धुरांडी पेटण्याची अनिश्चितता : कुलदीप कोंडे

अक्षराज : तुषार सणस

दि.२१ भोर, (पुणे) : राजगड कारखाना सुरू होणार का ? कामगारांचे थकीत पगार मिळणार का ? शेतकऱ्यांची थकीत बिले मिळणार का ? अश्या अनेक प्रश्नांची सोडवणूक होणार का ? राजगड सहकारी साखर कारखान्याची धुरांडी पेटण्याची अनिश्चिता असल्याचे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख कुलदीप कोंडे यांनी केले.

राजगड सहकारी साखर कारखाना, अनंतनगर,निगडे. भोर हा गेली सहा महिने पूर्ण पणे बंद होता. कारखान्याचे चेअरमन आमदार संग्राम थोपटे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत कारखाना पुढील दहा दिवसात सुरू करत असल्याची आणि कामगारांचे पगार, शेतकऱ्यांची थकीत एफ आर पी, इतर देणी क्रमवार देणार असल्याचे सांगितले होते .परंतु सर्व कामगार,शेतकरी सभासद कारखाना सुरू होण्याची वाट पाहत असतानाच कारखान्यावर जप्ती आल्याची माहिती सर्वत्र पसरली.याच पाश्रवभूमीवर कारखाना सुरू करण्यासाठी,शेतकऱ्यांची,कामगारांची देणी देण्यासाठी संचालक मंडळ यांनी काय पाऊल उचलले आहे .याची माहिती घेऊन पत्रकार परिषद घेण्यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख कुलदीप कोंडे, राजगड कारखाना कार्यक्षेत्रात गेले असता त्या ठिकाणी त्यांना पत्रकार परिषद कारखान्याच्या बाहेर घेण्याची विनंती केली.

राजगड कारखाना रोडवरच भारतीय बैठक घेत.कारखाना प्रशासनावर प्रश्नांचा वर्षाव करत कारखाना सुरू होणार का ,कामगारांचे पगार मिळणार का,कामगारांच्या भविष्याची तरतूद काय.असे अनेक प्रश्न उपस्थित करत १५ दिवसांमध्ये जर प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही तर मोठ्या आंदोलनाला कारखाना प्रशासन,संचालक मंडळ यांना सामोरे जावे लागेल असा इशारा पत्रकार परिषदेमध्ये कुलदीप कोंडे यांनी दिला तसेच निवेदन कारखाना व्यवस्थापक पाटील यांना दिले. त्या ठिकाणी शिवसेना संपर्क प्रमुख कुलदीप कोंडे,आदित्य बोरगे,किशोर बारणे,प्रशांत दानवले,संतोष लेकावळे,संदीप चिकणे, तसेच इतर शेतकरी,सभासद उपस्थित होते.ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

  राजगड सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील व्यवस्थापकाच्या कार्यालयात शेतकरी व सभासदांना पत्रकार परिषद घेण्यासाठी अडवणूक केली जात असून.रस्त्यावरच पत्रकार परिषद घेण्यासाठी कारखाना प्रशासनाने भाग पाडले. हा सर्व शेतकऱ्यांचा अपमान आहे जर आमच्या निवेदनाला १५ दिवसात उत्तर मिळाले नाही तर मोठे सर्व पक्षीय आंदोलन केले जाईल.

कुलदीप कोंडे ( शिवसेना संपर्क प्रमुख भोर)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे