Breaking
पश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

पारनेर तालुक्यात पुढार्‍यांना गावबंदी !

मराठा आरक्षणाचा प्रश्न ; देसवडेच्या सकल मराठा समाजाचा पुढाकार

0 3 9 1 0 5

पारनेर तालुक्यात पुढार्‍यांना गावबंदी !

मराठा आरक्षणाचा प्रश्न ; देसवडेच्या सकल मराठा समाजाचा पुढाकार

अक्षराज : वसंत रांधवण
दि.२२,पारनेर (अ. नगर) :
तालुक्यातील देसवडे येथे सकल मराठा समाजाच्यावतीने गावाच्य चौकात सर्व पक्षीय राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली. याचा फलक गावाच्या वेशीवर लावण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष; मराठा आरक्षण हेच आमच लक्ष असा मजकूर शेवगाव तालुक्यातील एका गावात फलकावर लावले आहे. प्रस्थापित राज्यकर्ते हे मराठ्यांची उधड बाजू कधीच घेताना दिसले नाही आणि अजूनही दिसत नाहीत. त्यांना मतांची भीती वाटते म्हणून ते आपल्या बाजूने येत नाहीत.

राजकीयदृष्ट्या मराठे जागे असतात. पण, त्यांना मतदार म्हणून देखील जागे होणे गरजेचे आहे. नव्या राजकीय पर्याय देखील उभा केला पाहिजे. तरच हे सर्व प्रस्थापित पक्ष वठणीवर येथील हे कळल्याने आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रेरणेने प्रेरित व हक्काच्या आरक्षणासाठी ते देत असलेल्या लढाईस पाठिंबा म्हणून शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव पाठोपाठ पारनेर तालुक्यातील देसवडे येथील सकल मराठा समाजाने सर्व आजी-माजी राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करून जिल्ह्यात सर्वप्रथम पुढाकार घेतला आहे.
शनिवारी (दि.२२) पासून तसे बोर्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असून लवकरच त्याचे लोन जिल्हा भर पोचणार असा दावा येथील सकल मराठा समाजाने केला आहे. देसवडे येथील व भावीनिमगाव सकल मराठा समाजाने जालना येथील सराटी येथे झालेल्या मोर्चात सर्वात जास्त युवकांनी गाड्यांचा मोठा ताफा घेऊन सहभाग नोंदविला होता. देसवडे सकल मराठा समाज हाकेला धावणारा आहे. अशी माहिती माजी सरपंच बाबासाहेब भोर यांनी दैनिक अक्षराज ला दिली आहे.

देसवडे परिसरातील गावांमधील लोकांनी सर्वपक्षीय पुढाऱ्यांना गावबंदी करा. या अगोदर देखील नगरला मराठा क्रांती मोर्चात सर्वात जास्त देसवडेकर उपस्थित होते. अंतरवाली सराटी येथे देखील मोर्चात सहभागी झाले होते. या विषयावर आज सोमवार दि.२३ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ग्रामसभेचे आयोजन केले आहे.

  • बाबासाहेब भोर
    (माजी सरपंच देसवडे)
1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे