Breaking
नागरी समस्यानिषेधब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय राहुल आठवले यांचा ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा

0 3 9 1 0 5

मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय राहुल आठवले यांचा ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा
अक्षराज : साहेबराव गागलवाड
दि.३०, मुदखेड (नांदेड) : मराठा आरक्षण प्रकरणी मुदखेड तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी पुढाऱ्यांना गावबंदी करण्यासाठी ठराव घेतले आहेत. परंतु आजच्या दीड महिन्या पासून मागणी करूनही बारड ग्रामपंचायत पुढाऱ्यांना गावबंदी करण्यासाठी ठराव घेत नसल्याने मागासवर्गीय ग्रामपंचायत सदस्य राहुल आठवले यांनी धाडसी निर्णय घेऊन राजीनामा देत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या अभूतपूर्व लढा राज्यात चालू झाला असून बारड ग्रामपंचायत सदस्य राहुल माणिकराव आठवले यांनी मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळणार तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात यावी अशा आशयाचा अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात ता २० सप्टेंबर रोजी सुपूर्द केला होता.

तालुक्यातील आजूबाजूच्या बहुतांश ग्रामपंचायतीनी ठराव घेऊन जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. परंतु बारड ग्रामपंचायत अशाप्रकारचा ठराव घेऊन पुढाऱ्यांना गावबंदी का करीत नाही या कारणास्तव बारड ग्रामपंचायत सदस्य राहुल आठवले यांनी राजीनामा देत सकल मराठा समाजाच्या लढ्यास पाठिंबा दर्शविला आहे. मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याच्या धाडसी निर्णयाचे तालुक्यातील प्रत्येक गावातील सकल मराठा समाजाने स्वागत केले आहे.

आज मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. परंतू येथील प्रस्थापितांना वाटते की मराठा समाजातील मुले शिकून हुशार आणि निडर बनली तर आपल्या खुर्च्या जाऊ शकतात. याची भीती धनदांडग्या प्रस्थापित मराठा नेत्यांना असल्याने मनोज पाटील जरांगे यांच्या भूमिकेला ते खुलेआम पाठिंबा देत नाहीत. माझा मराठा आरक्षण लढ्याला पूर्ण पाठिंबा असून मी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

  • राहुल माणिकराव आठवले
    बारड, ता मुदखेड
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे