Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबई व कोकण विभाग

दिवा शहरात अनधिकृत शाळांच्या संस्था चालकांवर कारवाईची ‘छडी’

दिवा शहरात दोन शाळा बंद करण्याचे पालिका प्रशासनाचे आदेश

0 3 9 1 0 5

दिवा शहरात अनधिकृत शाळांच्या संस्था चालकांवर कारवाईची ‘छडी’

दिवा शहरात दोन शाळा बंद करण्याचे पालिका प्रशासनाचे आदेश

दिवा शहरातील दोन अनधिकृत शाळेवर गुन्हे दाखल
अक्षराज : विनोद वास्कर
दि. २४, दिवा,(ठाणे) : विना परवाना अनधिकृतरित्या शाळा चालवणाऱ्या संस्था चालकांवर कारवाईचा बडगा उगारल्याचा प्रकार ठाण्यातील दिवा शहरामध्ये समोर आला. दिवा प्रभाग समिती समोर असलेल्या ब्राईटन इंटरनॅशनल स्कूल (खार्डी गांव) व केंट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल सुदामा रेसिडेन्सी (खार्डी गांव) या दोन खासगी अनधिकृत शाळांच्या संस्था चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शाळा विनापरवानगी सुरू असल्याचे पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यामुळे ही शाळा तत्काळ बंद करण्याचे आदेश ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळातर्फे देण्यात आले होते. मात्र तरी या शाळा सुरू असल्याने पालिका शिक्षण मंडळाने अखेर कारवाईचा बडगा उभारला.

ठाणे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळा बंद करण्याबाबत शाळांना वारंवार नोटीस बजावल्या जातात. मात्र अनेक ठिकाणी बिनदिक्कतपणे शाळा सुरु ठेवल्या जातात. अखेर आदेशान्वये संबंधित संस्था चालकांनी अनाधिकृतपणे सुरु असलेल्या शाळा बंद केल्या नाही. तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाते. त्यानुसार शिक्षण विभागाकडून खार्डी गाव येथील ब्राईटन इंटरनशनल इंग्लिश स्कुल आणि केंट व्हॅली इंटरनशनल स्कुल या दोन्ही शाळांच्या संस्था चालकांविरुध्द डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. येत्या काळात अशाच पद्धतीने अनधिकृत शाळावंर कारवाई केली जाईल, असे ठाणे पालिकेच्या शिक्षण मंडळांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे