Breaking
आरोग्यनागरी समस्यामुंबई व कोकण विभाग

नवी मुंबई कोपरखैरणे येथे वायू प्रदूषणाचा पुन्हा विळखा

0 3 9 0 8 7

नवी मुंबई कोपरखैरणे येथे वायू प्रदूषणाचा पुन्हा विळखा

अक्षराज : महादेव चव्हाण

दि.२८, नवी मुंबई : कोपरखैरणेत विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी अचानक होणाऱ्या वायुप्रदूषणामुळे नागरिकांना खोकला तसेच डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यास त्रास होणे असा प्रकार होत आहे. हवेतील रासायनिक घटकांमुळे हा प्रकार घडत आहे. परंतु नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळ काहीच कारवाई करीत नाही. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी कोपरखैरणेतील रहिवाशांना हा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री १० नंतर घराबाहेर पडल्यास प्रदूषित हवेमुळे नागरिकांना हा त्रास अधिकच सहन करावा लागत आहे. दोन दिवस पावसामुळे स्वच्छ झालेले वातावरण आज रात्री १० वाजल्यापासून नवी मुंबई (MIDC) मधून होणाऱ्या अति प्रमाणात वायू प्रदूषणामुळे पूर्णपणे दूषित झाले आहे. (कोपरखैरणे, नवी मुंबई. मध्यरात्री ०१:२० वाजता चे वातावरण)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 8 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे