Breaking
नागरी समस्याब्रेकिंगमुंबई व कोकण विभागराजकिय

महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतनाचे बँक खाते आयडीबीआय बँकमध्ये….

0 3 9 0 9 5

महानगरपालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतनाचे बँक खाते आयडीबीआय बँकमध्ये….

महापालिका आयुक्त यांची मंजुरी

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दर्जेदार सेवा सुविधा पुरविण्यासोबतच आर्थिक ताळेबंद ही सुस्थितीत राखण्याकडे नमुमपा  आयुक्त श्री राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष आहे. या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांचे वेतन एकाच बँकेतून व्हावे व या माध्यमातून कामकाजात सुनियोजित पणा यावा या दृष्टीने महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनाचे बँक खाते आयडीबीआय बँक मध्ये सुरू करण्यास नुकतीच महापालिका आयुक्त यांनी मंजुरी दिली असून तशा प्रकारचा सामंजस्य करार  नवी मुंबई महानगरपालिका आणि आयडीबीआय बँक व्यवस्थापन यांच्यामध्ये करण्यात आला. याद्वारे नमुमपा  अधिकारी, कोणतीही अतिरिक्त प्रीमियम रक्कम न भरता मोठ्या स्वरूपाचे लाभ मोफत उपलब्ध करून देणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर तसेच आयडीबीआय बँकेच्या वतीने मुख्य व्यवस्थापक शशांक दीक्षित यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी महानगरपालिकेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी सत्यवान उबाळे तसेच प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, लेखाधिकारी दयानंद कोळी आणि आयडीबीआय बँकेचे अधिकारी महाव्यवस्थापक बँकेचे अधिकारी महाव्यवस्थापक तथा नवी मुंबई चे वरिष्ठ क्षेत्र प्रमुख टोनी सॅबस्टीन, उपमहाव्यवस्थापक तथा वाशी शाखाप्रमुख संजय कुमार उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आलेल्या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांची बँक खाते एका बँकेत व मुख्यालयाबाहेर असलेल्या कार्यालयातील बँक खाते वेगवेगळ्या बँकांमध्ये होती. सदर बँक खाते एकाच बँकेत असतील तर महानगरपालिकेस एक संस्था म्हणून आर्थिक व्यवहार करणे सोयीचे होईल व विविध सुविधांच्या स्वरूपात महापालिका अधिकारी कर्मचारी यांनाही अधिकचा काही लाभ मिळू शकेल याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी संकल्पना मांडली होती. मुंबई महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांना विविध सुविधांचे लाभ बँकेमार्फत देण्यात येणार आहेत. यामध्ये 2 लक्ष रकमेचा कॅशलेस ग्रुप इन्शुरन्स दिला जाणार असून दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास वैयक्तिक अपघात विमा 1 कोटी रकमेपर्यंत ऑन ड्युटी /ऑफ ड्युटी लागू लागू असणार आहे. इतक्या मोठ्या स्वरूपाचा लाभ कर्मचाऱ्याकडून कोण कोणताही अतिरिक्त प्रीमियम भरून न घेता मोफत उपलब्ध करून देणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका आहे. यासोबत मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांना पाच लक्ष रकमेपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार जास्तीत जास्त एक कोटीपर्यंत विमा रक्कम तसेच कायमस्वरूपी अंशी अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणानुसार जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत विमा रक्कम प्राप्त होणार आहे. या खेरीज एटीएम मधून पैसे काढण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. महत्त्वाचे म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी वृंदास विविध सुविधांच्या स्वरूपात  त्याचा प्रत्यक्ष लाभ कोणताही अतिरिक्त रक्कम भरावी न लागता मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी त्याचप्रमाणे महापालिकेच्या सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची वेतन बँक खाते एकाच बँकेत आल्याने लेखा विभागास आर्थिक नियोजन करण्यासाठी सोयीची अशी ही नवीन प्रणाली सर्वच दृष्टीने लाभदायी ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 9 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे