Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबई व कोकण विभाग

झोपलेले प्रशासन जागे झाले : वाईन शॉपची दुकाने वेळेवर बंद, उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई

0 3 9 1 0 4

झोपलेले प्रशासन जागे झाले : वाईन शॉपची दुकाने वेळेवर बंद, उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई
अक्षराज : रमेश राऊत
दि. ०२, दिवा (ठाणे ) :
दिवा टर्निंग येथील रस्त्यावर उभे राहून दारू पिणाऱ्या बेवड्यांवर आणि वाईन शॉप वर आज कारवाई करण्यात आली.विनोद वास्कर, माजी नगरसेवक शैलेश पाटील, (शिंदे गट) भारतीय जनता पार्टीची महिला मोर्चा अध्यक्ष सपना रोशन भगत, रोहिदास मुंडे (उद्धव ठाकरे गट) यांनी काही दिवसापूर्वी प्रशासनाकडे पाठपुरवठा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला यश आला आहे. आज सर्व दिव्याच्या परिसरातील उघड्यावर मद्यपान करणाऱ्या बेवड्यांवर कारवाई करण्यात आली.

तसेच दुकानदारांवरही कारवाई करण्यात आली. बेवडा हटाव दिवा बचाव असा आंदोलनाचा इशारा सपना भगत यांनी दिला होता १० दिवसाची त्यांनी मुदत दिली होती. १० दिवसात पोलीस प्रशासनाने जर कारवाई केली नाही, सदर ठिकाण दारू पिणाऱ्या पासून मुक्ती केली नाही तर भाजपा महिला मोर्चा तर्फे आमच्या स्टाईलने आंदोलन करू असे पत्र भाजपा ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वात, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण, मुंब्रा पोलीस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकारी कोलटकर साहेब, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलीस आयुक्तालय ठाणे वरिष्ठ अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्तालय ठाणे वरिष्ठ अधिकारी, आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर मतदार संघ आमदार निरंजन डावखरे यांना देण्यात आले होते.

याठिकाणी कारवाई अगोदर मद्यपींची अशी गर्दी बघायला मिळत असे.

पोलीस प्रशासनाने कारवाई केल्यामुळे माता-भगिनींना खूप आनंद झाला पहिल्यांदाच दिव्यामध्ये कारवाई करण्यात आली. अशीच कारवाई प्रत्येक दिवशी होणार का? असे नागरिक आता विचारत आहेत?

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे