Breaking
कार्यक्रमब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ

छत्रपती शिवरायांचा भारतातील सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा विराजमान

0 3 9 1 0 4

अक्षराज : प्रतिनिधी

दि.०४ बुलडाणा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा भारतातील सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा चबुतऱ्यावर आज दि.०४ डिसेंबर रोजी बुलडाणा येथील संगम चौक याठिकाणी विराजमान झाला आहे. या अश्वारूढ पुतळ्याची उंची हि ९२ फूट आहे. असंख्य शिवभक्तांच्या साक्षीने सर्व समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा भव्यदिव्य विराजमान सोहळा पार पडला.

बुलढाणा शहरातील संगम चौक येथे भारतातील पहिला भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असंख्य शिवभक्तांच्या साक्षीने शहरातील सर्व समाजातील संत-महापुरुषांच्या स्मारकसमिती पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडला. यावेळी त्या ठिकाणी असंख्य शिवप्रेमी तसेच शिवस्मारक समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी तथा सदस्य उपस्थित होते. युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांनी क्रेनमधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे