Breaking
मुंबई व कोकण विभागराजकिय

मनसेच्या दणक्याने गुजराती कंपनीने दिले मराठी माणसाचे पैसे…

0 3 9 1 0 5

मनसेच्या दणक्याने गुजराती कंपनीने दिले मराठी माणसाचे पैसे…


अक्षराज : विनोद वास्कर
दि.१४, महापे (नवी मुंबई) :
श्री नंदन कुरिअर लिमिटेड ही मुळ गुजरात ची कंपनी असुन मुंबई मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हब आहेत. गेली ३ महिनेपासुन मराठी व्यावसायिक सिध्देश पडवळ यांचे टेम्पो चे पेमेंट रखडवले होते. आज मनसे शाखा अध्यक्ष सयाजी चव्हाण (सरकार) मनसे कार्यकर्त्यांसह नंदन कुरिअरच्या महापे हबला भेट देऊन हबला टाळे मारले. जोपर्यंत पेमेंट अकाउंटला येणार नाही तोपर्यंत एकही कुरिअरचे पार्सल बाहेर जाणार नाही. असा इशारा दिला. त्यानंतर २ तासात एक लाख ३० हजार चे पेमेंट व्यवसायिकाच्या अकाउंट मध्ये जमा झाले. त्यानंतर शाखाध्यक्ष सयाजी चव्हाण व पूर्ण मनसे कार्यकर्ते हबच्या बाहेर आले. यानंतर चव्हाण यांनी असा कंपनीला इशारा दिला आहे की, मुंबईमध्ये जेवढे ही कंपनीचे हब आहेत. त्यामध्ये काम करणारे स्टाफ ५० टक्के मराठी पाहिजे. मराठी टेम्पो व्यवसायिक यांनी मनसेचे व शाखाध्यक्ष सयाजी चव्हाण यांचे आभार मानले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे