Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रविदर्भ

ती किन्नर लॉजवर गेली अन गावगुंडांकडून झाला लैंगिक अत्याचार

0 3 9 1 0 5

ती किन्नर लॉजवर गेली अन गावगुंडांकडून झाला लैंगिक अत्याचार

बुलडाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रभर बलात्काराच्या घटनांचे प्रमाण वाढले असून दरम्यान आता पुन्हा बुलडाणा जिल्ह्याला हादरवून टाकणारे वृत्त मलकापूरातून समोर आले आहे. आपल्या व्यक्तिगत कामासाठी मलकापूरात गेलेल्या चिखलीच्या एका २३ वर्षीय किन्नरावर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची घटना गुरुवार,२८ डिसेंबर रोजी घडली आहे.

पीडित किन्नरावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अद्याप पोलिसांत नोंद नाही. पिडीत किन्नराने याबाबत स्वतः अक्षराज मीडियाच्या प्रतिनिधीला याबद्दल सांगितले. घटनेच्या दिवशी संध्याकाळी पिडीत किन्नर चिखलीतून मैत्रिणीला भेटण्यासाठी मलकापूरातील एका लॉजवर गेली होती. मलकापूरात आपल्या किन्नर समूहात नवीन चेहरा दिसल्यामुळे त्याठिकाणी मलकापुरातील किन्नरांची टोळी जमली.

परंतु मला तुमचे काम करायचे नाही मी पोलीस भरतीची तयारी करत आहे असे पीडित किन्नराने त्या (मलकापुरातील किन्नर) टोळीला सांगितले. मात्र तिथल्या टोळीने तिला उचलून त्यांच्या अड्डयावर आणले. त्यानंतर गावगुंडाना बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. केस कापण्यात आले व तिला जोरदार माहेर करण्यात आली आहे. सध्या पीडित किन्नरावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसात तक्रार नोंदवणार असल्याचे तिने अक्षराज मीडियाला सांगितले. सदरच्या घटनेमुळे बुलडाणा जिल्हा हादरला असून अश्या प्रकारच्या घटनांमुळे मात्र नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे