Breaking
क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई व कोकण विभाग

महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा डोंबिवलीमध्ये होणार

0 3 9 1 0 5

महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा डोंबिवलीमध्ये होणार

सर्वांना उत्सुकता असलेली महाराष्ट्रातील सर्वात मोठी टेनिस क्रिकेट स्पर्धा हेदुटणे- खोणी,लेकशोअर पलावा समोर, बदलापूर पाईपलाईन रोड, डोंबिवली पूर्व या ठिकाणी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक २०२४ भव्य क्रिकेट स्पर्धा गुरुवारी १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. रविवारी २८ जानेवारी संपन्न होणार आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टेनिस क्रिकेट प्रेमी या ठिकाणी दाखल होणार आहेत. या स्पर्धेमध्ये ग्रामीण खेळाडू, ओपन खिळाडू, ४० प्लस खेळाडू, सेलिब्रेशन खेळाडू, आपले नशीब अजमणार आहेत. या स्पर्धेत ग्रामीण संघासाठी उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज खेळाडूला प्रत्येकी एक होंडा ॲक्टिवा देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खेळाडूला सायकल आणि चषक बक्षीस देण्यात येणार आहे. मालिकावीर खेळाडूला कार आणि चषक ग्रामीण भागासाठी असणार आहे.

शहरी भागासाठी मालिकावीर खेळाडूसाठी मोटर सायकल (बाईक) व चषक देण्यात येणार, ४० प्लस मालिकावीर खेळाडूसाठी मोटर सायकल (बाईक) व चषक देण्यात येणार आहे, कल्याण, बदलापूर, रायगड गट या संघासाठी मालिकावीर खेळाडूसाठी टीव्ही (एलइडी) व चषक देण्यात येणार आहे. १८ जानेवारीपासून ते २१ जानेवारीपर्यंत ४८ ग्रामीण संघ खेळवले जातील. २२ जानेवारी या दिवशी ४० प्लस चे १२ संघ खेळवले जातील. २३जानेवारी ते २५ जानेवारी पर्यंत शहरी इंडिया ओपन २४ संघ खेळवले जातील. शनिवारी २७ जानेवारी २०२४ रोजी कल्याण, बदलापूर, रायगड, गट १२ संघ खेळवले जातील. हे सामने पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोचे संख्येने क्रिकेट प्रेमी या स्टेडियम मध्ये आपली उपस्थिती लावणार आहेत. या स्पर्धेला क्रिकेटचा कुंभमेळा ही म्हटला जातो. अनेक मंत्री, राजकीय नेते, सेलिब्रिटी, डॉक्टर, पोलीस, आजी, माजी, लेझर टेनिस क्रिकेटचे महान खेळाडू, असे अनेक मान्यवर या क्रिकेटच्या मंचावर आपली उपस्थिती लावत असतात. आयोजक : जय दुर्गा माता क्रिकेट संघ ( काटई ) ही स्पर्धा व्यवस्थित पार करण्यासाठी ११ दिवस सतत मेहनत घेत असते. आलेल्या क्रिकेट प्रेमींना बसण्यासाठी खेळाडूच्या नावाने अलग अलग स्टँड बनवण्यात येतात. त्या स्टॅन्ड मध्ये खेळाडू बसून क्रिकेटचे सामने पाहत असतात. आणि आनंद घेत असतात.आयोजकांकडून सर्व क्रिकेट प्रेमींना ही स्पर्धा पाण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. आलेल्या मान्यवरांचे सन्मानचिन्ह आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला जातो. त्यांना मान सन्मान दिला जातो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्फूर्ती चषक २०२४ ला वीस वर्षे पूर्ण होत आहे. आयोजकांनी आपली परंपरा कायम राखली आहे.
विजेता ग्रामीण संघासाठी प्रथम पारितोषिक ५ लाख रुपये रोख रक्कम व चषक, द्वितीय पारितोषिक ३ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम व चषक, तृतीय पारितोषिक २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम व चषक, चतुर्थ पारितोषिक २ लाख ५० हजार रोख रक्कम व चषक विजेते संघाला बक्षीस असणार आहे.

विजेता शहरी संघासाठी प्रथम पारितोषिक ५ पाच लाख रुपये रोख रक्कम व चषक, द्वितीय पारदोषिक २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम व चषक, तृतीय पारदोषिक १ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम व चषक, विजेता संघासाठी बक्षीस ठेवण्यात आले आहे.

विजेता कल्याण, बदलापूर, रायगड, गट संघासाठी प्रथम पारितोषिक १ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम व चषक, द्वितीय पारितोषिक १ लाख रुपये रोख रक्कम व चषक विजेता संघासाठी बक्षीस ठेवण्यात आले आहे.
विजेता ४० प्लस ग्रामीण संघासाठी प्रथम पारितोषिक १ लाख रुपये रोख रक्कम व चषक, द्वितीय पारितोषिक ५० हजार रुपये रोख रक्कम व चषक विजेता संघासाठी बक्षीस ठेवण्यात आले आहे.

ग्रामीण खेळाडू ५७६, कल्याण बदलापूर, रायगड, गट १४४ खिळाडू, ४० प्लस १४४ खेळाडू, शहरी खिळाडू २८८, असे टोटल ११५२ खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार.

स्वर्गीय रतन बुवा पाटील स्फूर्ती चषक २०२४ मध्ये या क्रिकेटच्या क्रीडांगणाच्या रंगभूमीमध्ये कोणाचं भाग्य उजळणार, कोण ठरणार मालिकावीर, कोणता संघ प्रथम पारितोषिक मिळवणार हे पाहण्यासाठी तुम्हाला सर्व क्रिकेट प्रेमींना या क्रीडांगणावर उपस्थिती लावावी लागणार आहे. ही स्पर्धा व्यवस्थित पार पाडण्यासाठी विनोद पाटील, काशिनाथ पाटील, अनंता पाटील, महेश पाटील, दत्ता चौधरी, अनिल पाटील, राजेश पाटील, प्रफुल्ल पाटील, असे अनेक जण ही स्पर्धा पार पाडण्यासाठी प्रत्येक दिवस मेहनत घेत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे