Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्र

रोहिपिंपळगांवच्या त्या घटनेचे आरोपी जेरबंद..

पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या..

0 3 9 1 0 5

नमुद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन शशिकांत महावरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड व श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी घटनास्थळी भेट देवुन त्यांचे आदेशाने खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड व पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा कॅम्प मौजे रोहीपिंपळगाव ता. मुदखेड या गावात करण्यात आला होता. पोलीसांचे वेगवेगळे ०६ तपास पथके तयार करुन पथकाकडुन गावातील लोकांना विचारपुस केली. तसेच गोपनिय बातमीदार नेमण्यात आले, गुन्ह्यात भौतीक, तांत्रीक पुरावे हस्तगत करुन अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात आला.

पोलीसांना मिळालेल्या गोपनिय बातमी वरुन आरोपी दशरथ ऊर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ, वय-२३ वर्ष, व्यवसाय मजुरी/सुतारकी रा. रोहिपिंपळगाव ता. मुदखेड जि. नांदेड यास ताब्यात घेवुन गुन्ह्यासंबंधाने विचारपुस केली असता, त्यांने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. आरोपीस सदर गुन्ह्यांचे अधिक तपासासंबंधाने पोलीस कोठडी मिळवण्यासाठी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस दिनांक ३१/०१/२०२४ रोजी पावेतो पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्ह्यात इतर आरोपीचा सहभाग आहे काय? याचा तपास चालु असुन, सदर गुन्ह्याचा तपास सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग इतवारा हे करीत आहेत. नमुद गुन्ह्याचा तपास शशिकांत महावरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, नांदेड, श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, पोनि उदय खंडेराय, वसंत सप्रे, सपोनि चंद्रकांत पवार, पांडुरंग माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलताई शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब कांबळे, पोउपनि दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, अशिष बोराटे, दशरथ आडे, गजानन दळवी स्थानिक गुन्हे शाखेचे अमंलदार, मुदखेड पोलीस स्टेशनचे अमंलदार तसेच पो. स्टे. नांदेड ग्रामीण, इतवारा पो.स्टे. लिंबगाव व सायबर सेल येथील अमंलदार यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे. नमुद पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी कौतुक केले आहे.
सदर घटनेच्या अनुषंगाने अत्यंत तिव्र संताप व्यक्त केला जात होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे