Breaking
क्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई व कोकण विभाग

शाहीर शाहिद खेरटकर यांना विश्व समता कला-भुषण पुरस्कार जाहीर

0 3 9 1 0 5

शाहीर शाहिद खेरटकर यांना विश्व समता कला-भुषण पुरस्कार जाहीर

अक्षराज : उदय दणदणे
दि.३१, गुहागर :
गेली १८ वर्षे अविरतपणे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, धार्मिक, कला , क्रीडा, जल, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या विश्व समता कलामंच लोवले, संगमेश्वर या संस्थेच्या वतीने देण्यात येणारे “राज्यस्तरीय विश्व समता पुरस्कार” जाहीर करण्यात आले असून सदर पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दि.१० फेब्रुवारी २०२४ रोजी सांयकाळी ७.००वा, शुभगंधा मंगल कार्यालय मयुरबाग लोवले ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न होणार आहे.
यावर्षी राज्यस्तरीय विश्व समता “कलाभूषण पुरस्कारासाठी” कोकण प्रांतातील एक प्रतिभावंत आणि आपल्या काव्य, गायन आणि वक्तृत्वातून समतेचा विचार पेरणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व शाहीर शाहिद खेरटकर यांची निवड झाली आहे. शाहीर शाहिद खेरटकर हे गेली २५ वर्षे कलाविश्वाला परिचित आहेत.

त्यांनी कोकणची समृद्ध लोककला जाखडी (कलगी तुरा)या लोककलेच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.जात धर्माच्या पलीकडे जाऊन एक मानवतावादी कलाकार म्हणून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यांची लेखणी नेहमीच छत्रपती शिवराय, शाहू फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी फुलताना दिसते. ते एक शाहीर आहेतच त्याबरोबर ते उत्कृष्ट कवी, निवेदक, वक्ता आणि एक जाणकार पत्रकार म्हणून देखील प्रख्यात आहेत. आजवर त्यांनी शेकडो कार्यक्रम कोकण प्रांतात तसेच मुंबई पुण्याच्या विविध नाट्यगृहांच्या रंगमंचावर सादर केले आहेत. अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनात कवी म्हणून त्यांनी आपली छाप सोडली आहे. तसेच विविध विषयांवर त्यांनी महाराष्ट्रभरातून व्याख्याने देखील दिली आहेत.त्यांचा “ललकारी” हा कविता संग्रह थोड्याच दिवसात प्रकाशित होत आहे,ज्यामध्ये त्यांनी आपल्या विचारांची नेमकेपणाने पेरणी केली आहे.अशा या हरहुन्नरी कलाकाराला “विश्व समता कलाभुषण पुरस्कार” जाहीर झाल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे आणि कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे