Breaking
गुन्हेगारीमहाराष्ट्रमुंबई व कोकण विभागराजकिय

कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून माजी नगरसेवकावर आंदाधुंद गोळीबार

0 3 9 1 0 5

आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून माजी नगरसेवकावर आंदाधुंद गोळीबार

भाजप आमदार गणपतसेठ गायकवाड यांच्याकडून माजी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड व त्यांच्या साथीदार राहुल पाटील यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. सविस्तर माहिती अशी की, कल्याण पूर्वचे आमदार गणपतसेठ गायकवाड व माजी नगरसेवक महेश पाटील शिवसेना (शिंदेगट) यांच्या मधील आपापसातील वाद अनेक दिवसापासून दुमसत होता. कित्येक वेळा दोघांमध्ये शाब्दिक वाद होत असल्याच्य बोले जात होते. पण याचे पर्यावसान या थराला जाईल हे कोणी विचार केला नाही. एका जमिनीच्या वादात गणपत गायकवाड व माजी नगरसेवक महेश गायकवाड व त्यांचे सहकारी राहुल पाटील हे उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाणे येथे गेले असता त्यांचामध्ये शाब्दिक बाचाबाची व शिवीगाळं झाली व त्यात आमदार गायकवाड यांच्याकडून पोलीस अधिकाऱ्याच्या समोर महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर ५ राउंड फायर करण्यात आले. या घटनेत महेश पाटील व राहुल पाटील हे जखमी झाले होते. उल्हासनगर येथील मीरा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून माज्याकडून स्व रक्षणासाठी गोळीबार केल्याचे बोले जात होते. पुढील तापास हिल लाईन पोलीस करत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे