Breaking
कार्यक्रममुंबई व कोकण विभाग

श्री गांवदेवी आई मंदिराचा ७ वा वर्धापन दिन सोहळा यशस्वीपणे संपन्न

0 3 9 1 0 5

श्री गांवदेवी आई मंदिराचा ७ वा वर्धापन दिन सोहळा यशस्वीपणे संपन्न

जिल्ह्यातील निसर्गरम्य गाव तसेच हेमांडपंथी बांधकाम असलेले पांडवकालीन सुप्रसिद्ध श्री खिडकाळेश्वर मंदिर असलेले गाव म्हणजे खिडकाळी गांव. खिडकाळी गावातील गांवदेवी मंदिराचा सन २०१७ मध्ये जीर्णोध्दार केला गेला. मंदिराचे नवनिर्माण करण्यासाठी ‘आई गावदेवी चॕरिटेबल ट्रस्ट’ ची स्थापना केली. सदर ट्रस्टमधील सक्रिय सदस्य यशवंत पाटील (अध्यक्ष), पंढरीनाथ पाटील (उपाध्यक्ष), वासुदेव पाटील (उपाध्यक्ष), किशोर पाटील (सेक्रेटरी),अनिल शेलार(सेक्रेटरी),सत्यवान पाटील (खजिनदार), व इतर सदस्य मंडळी फुलाजी पाटील, संजय पाटील, बबन शेलार, संजीव ठाकुर, मनोज पवार, भगवान पाटील, रवी पाटील, करसन पाटील, काशिनाथ पाटील, कै.सुखदेव पाटील या सदस्यांचे मोलाचे योगदान, ग्रामस्थांचे व दानशूरांचे सहकार्य यामुळे भले मोठे एक आकर्षक व सुंदर गांवदेव-गांवदेवी मंदिर उभे राहिले. मंदिराचा वर्धापन दिन म्हणून प्रथम वर्षी ३ दिवस उत्सव साजरा केला गेला. मूर्तींची प्राणप्रतिष्ठा प.पू.बालयोगी सदानंद महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. तसेच शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांचीही उपस्थिती लाभली होती. गावात मूर्तींची मिरवणूक, होम-हवन, महापूजा, प्राणप्रतिष्ठा विधी, कथा-किर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम इ. कार्यक्रम उत्साहाने संपन्न झाले. पंचक्रोषितून हजारो भाविकांनी हजेरी लावली. ‘कृतज्ञभावानुबंध गृप’ ने सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. अशी माहिती ग्रामस्थ नवनाथ ठाकुर यांनी दिली. त्यानंतर दरवर्षी ३ फेब्रुवारी हा दिवस मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी वर्धापन दिनाचं हे सातवे वर्ष होतं.


यावर्षीही सकाळपासून अभिषेक व आरती, पालखी मिरवणूक, श्री सत्यनारायणाची महापूजा, सामुदायिक हरिपाठ, किर्तनसेवा व परमेश माळी निर्मित मनोरंजन कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन ‘आई गांवदेवी चॕरिटेबल ट्रस्ट’ च्या सदस्य व ग्रामस्थांनी केले होते. कार्यक्रमात मान्यवर व दानशूर व्यक्तींचे यथोचित स्वागत करण्यात आले. तसेच गावातील ग्रामस्थांचा सन्मानही करण्यात आला. कु.आतीष घरत यांचा कुस्तीमध्ये तिसरा क्रमांक पटकावल्यामुळे सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध साहित्यिक नवनाथ ठाकुर यांना २०२४ चा ‘साहित्य भूषण पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. रामलल्लाची आकर्षक रांगोळी काढल्याबद्दल कु.शुभांगी पाटील व धनेश ठाकुर यांचाही सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे महादेव म्हात्रे , अमर व प्रथमेश पाटील, बंटी म्हात्रे, करसन पाटील अशा योगदान करणाऱ्या दानशूरांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये मंडप डेकोरेटटर्स, Youtube channel live सेवा, जनरेटर, मोफत वाहतूक सेवा व इतर सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचेही सन्मान करण्यात आले.
शेवटी सर्वांनी परमेश माळी आयोजित कोळीगीत व लोकगीतांचा (आॕर्केस्ट्रा) आस्वाद घेतला.
अशाप्रकारे ७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 1 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे