उद्या ठाण्याच्या काही भागात पुन्हा पाणी पुरवठा बंद…

Spread the love

उद्या ठाण्याच्या काही भागात पुन्हा पाणी पुरवठा बंद

अक्षराज : संजय पंडित

दि.०३, ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतील टेमघर जल शुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब उपकेंद्रातील पावसाळ्या पूर्वीची अत्यावश्यक देखभाल, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी कामे येत्या बुधवारी ०४ जून रोजी करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार द. ०४ जून रोजी स ९.०० ते रा. ९.०० या काळात १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी, बुधवार ०४ जून रोजी स. ९.०० ते रा. ९.०० वाजेपर्यंत घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिध्दांचल, समता नगर, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथे १२ तासासाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील. इतर भागात, स्टेम प्राधिकरणामार्फत येणारा पाणी पुरवठा झोनिंग करुन सुरू ठेवण्यात येणार आहे. 

(हे वाचले का ?👇🏻)

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर…
https://aksharaj.in/नाशिकच्या-सिंहस्थ-कुंभमे

दरम्यान, पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. तरी, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा, पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!