Author name: newsaksharaj2021@gmail.com

ताज्या बातम्या, मुंबई /कोकण, राजकीय

शिंदे गटाने हिंदुत्व ८ हजारात विकले का ?

मुस्लिमांना ८ हजारात स्टॉल देऊन दिव्यातील शिंदे गटाने हिंदुत्व ८ हजारात विकले का ?
शिवसेना ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडेंचा शिंदे गटाला टोला
अक्षराज :विनोद वास्कर

दि. २९, दिवा (ठाणे) : शिंदे गटाच्या शहरप्रमुखामार्फत दिवा शहरात दिवा महोत्सव सुरू असून येथे मुस्लिमांना ८ हजारात व्यावसायिक स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परिणामी हिंदुत्वावरून उद्धव साहेबांवर टीका करणाऱ्या शिंदे गटाने ८ हजार रुपयात हिंदुत्व विकलं का ? असा सणसणीत टोला शिवसेना ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी लगावला आहे.

शिंदे गटाच्या भूमिकेवर आक्षेप घेताना रोहिदास मुंडे यांनी शिंदे गटाच्या दिवा शहरप्रमुखाच्या कृतीवर बोट ठेवले आहे. एकीकडे उद्धव साहेबांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घेरणारे शिंदे गट स्वतः मात्र दिवा महोत्सव मध्ये पैशांसाठी मुस्लिम व्यवसायिकांना संधी उपलब्ध करून देतात यांनी केलं तर ते चालतं मात्र उद्धव साहेबांनी माणूसकीच्या दृष्टिकोनातून सर्व धर्मांना समान वागणूक दिली तर मात्र ते उद्धव साहेबांवर हिंदुत्व सोडण्याचा आरोप करतात. दुतोंडी भूमिका असणाऱ्या शिंदे गटाचा बुरखा दिवा महोत्सव मधील व्यावसायिक गाळे मुस्लिम व्यक्तींना आठ हजारात दिल्याने फाटला गेला असल्याचे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.

मराठवाडा, सामाजिक

हदगांव ते भानेगांव रोडचे काम अत्यंत संथ गतीने ! जीव मुठीत धरून करावा लागतो गावकऱ्यांना प्रवास


अक्षराज : चंद्रकांत भोरे
दि.२१, हदगांव (नांदेड) :

तालुका हदगांव पासून ९ कि.मी.अंतरावर भानेगाव हे गाव महामार्गापासुन जवळ असताना मुख्य रोड पासुन बऱ्याच दिवसांपासून रोड चे काम चालूं आहे. परंतु गुत्तेदाराच्या हलगर्जीपणा मुळे हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

रस्त्यावर मोठी खडी, दोन्ही बाजूला अंथरून टाकली असुन यावरून पायी चालणे सुध्दा आवघड आहे. त्यावर दबई सुद्धा फिरवली नाही, मोठ्या प्रमाणात पाण्याचा फार मोठा अभाव आहे, बाकी तर सोडाच… संबंधित गुत्तेदार यांनी कोणत्या नियमानुसार हे रोडचे काम करीत आहे. हे समजण्यासाठी मार्ग नाही. संबंधित रोड हा डागडुजीचा आहे की रोड आहे हा मोठा प्रश्न गावकऱ्यांना पडलेला आहे. कारण जे जुना रोड आहे तो उखरणे ऐवजी त्याच्या आजूबाजूने मुरूम टाकून तसाच दाबून सोडलेला आहे. त्यामुळे भविष्यात हा रोड टिकेल किं नाही अशी शंका उद्भवत आहे?
पहीले एका बाजूने रस्ता प्रवासासाठी चांगला करायचा असताना सुद्धा त्यांनी दोन्ही बाजूने मोठी खडी रोडवर टाकून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आणला आहे. जर एखादी मोठी दुर्घटना घडली तर याला संबंधित गुत्तेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग हदगाव जबाबदार राहील. असे गावकर्यात कुजबुज होत आहे.सदरील रस्त्यामुळे टू व्हीलर घसरून दररोज लहान, सहान अपघात होत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग हदगाव यांनी त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.

ताज्या बातम्या, मुंबई /कोकण, राजकीय

मुंब्रातील अनधिकृत बांधकारावरून भाजप आक्रमण


अक्षराज : विनोद वास्कर
दि. २०, मुंब्रा (ठाणे) :
मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून गुरुवारी अनधिकृत बांधकामाबाबत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. केवळ मुंब्राच नव्हे तर सर्व प्रभाग समिती क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामाबाबत आंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागणार असून राजकीय पक्षांकडून पुन्हा एकदा अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात गुरुवारी अनाधिकृत बांधकामाबाबत आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन करताना मुंब्रा मध्ये कशा पद्धतीने विकास झालेला नाही हे दाखवण्यात आले. मुंब्रात सध्या ३५ ते ४० अनाधिकृत बांधकामे सुरू असून यावर पालिकेच्या अधिकाऱ्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. मुंब्रात पुन्हा एकदा लकी कंपाऊंड करायचे आहे का? असा प्रश्न संजय वाघुले यांनी उपस्थित केला आहे. केवळ मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नव्हे तर संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात अनाधिकृत बांधकामे सुरू असून आता सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा ठाणे भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या, मुंबई /कोकण

२० वर्षापेक्षा जुन्या गाड्यांची नोंदणी रद्द करणे आवश्यक 

अक्षराज : जे के. पोळ 

दि.२१, ठाणे : मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या निर्णयान्वये, २० वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या काळ्या-पिवळ्या जीप टॅक्सीची नियमानुसार नोंदणी रद्द करणे आवश्यक आहे. तथापि अशी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जातात. अशा वाहनांमुळे अपघात होऊन रस्त्यावरील इतर वाहने तसेच प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होतो. नोंदणी वैधता संपलेल्या वाहनांची तपासणी करण्यात येत असून ही वाहने जप्त करण्याची कार्यवाही परिवहन विभागामार्फत सुरु आहे.

तरी २० वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान होऊन नोंदणी वैधता संपलेल्या वाहनांच्या परवाना धारकांनी काळ्या-पिवळ्या जीप टॅक्सी परवाना रद्द करून नवीन वाहन परवाना काढून घ्यावा. त्याचप्रमाणे काळ्या-पिवळ्या जीप टॅक्सीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एम-परिवहन ॲपचा वापर करून वाहनाच्या नोंदणी क्रमांकानुसार वाहनांची नोंदणी वैधता / योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेली आढळून आल्यास अशा वाहनांतून प्रवास करू नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी नागरिकांना केले आहे.

ताज्या बातम्या, मराठवाडा

येळी येथे रेती चोरीवर संयुक्त कारवाई !


अक्षराज : साहेबराव गागलवाड
दि.२१ , नांदेड :
नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन प्लश आउट अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. त्या अनुषंगाने दि.२० डिसेंबर रोजी उस्मान नगर हद्दीतील लोहा तालुक्यातील येळी येथे गोदावरी घाटावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती लोहा तहसीलदार यांना मिळाली असता पथकांसह तहसीलदार यांनी जाऊन त्या ठिकाणी धाड टाकून अनेक साहित्य जप्त करून नष्ट केले आहे.
उस्माननगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या येळी येथे नदीपात्रातून अवैधरित्या रेती चोरी सुरू होती. याबाबतची माहिती लोहा येथील तहसीलदार विठ्ठल परळीकर, उस्माननगरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, उपनिरीक्षक गजानन गाडेकर यांना मिळताच त्यांनी पोलीस प्रशासनासह व महसूल प्रशासन त्या ठिकाणी जाऊन दाड टाकली. या धाडीत १० तराफे २ बोट ४ इंजिन असा एकूण २५ लाख रुपयांचे साहित्य जाळून नष्ट केले आहे.


सविस्तर वृत्त असे की, येळी येथून अवैध रित्या रेतीची चोरी होत असून दररोज हजारो ब्रास रेती चोरी केली जात होती, याबाबतची तक्रार संबंधित तहसीलदार यांना व पोलिस प्रशासनाला गुप्त बातमी मिळाली. त्यावरून त्यांनी येळी या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी तराफे इंजिन व बोट यांच्या साह्याने अवैध रेती उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून त्यांनी उस्मान नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांच्या टीम सोबत धाड टाकली व १० तराफे २ बोट ४ इंजिन असा एकूण २५लाख रुपयांचे साहित्य नष्ट करण्यात आले असून महसूल विभागाकडून अहवाल व पंचनामा प्राप्त होताच महसूल पथकाच्या तक्रारीवरून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्याची तजवीज  ठेवली आहे उस्मान नगर पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याने वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.

ताज्या बातम्या, मराठवाडा, सामाजिक

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद

परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पालम शहर कडकडीत बंद

अक्षराज : बालासाहेब फुलपगार
दि.११, पालम (परभणी) :
परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील प्रतिकात्मक भारतीय संविधानाची प्रतिमा तोडून संविधानाची विटंबना व अवमान करणाऱ्या देशद्रोही आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावे या मागणी साठी व सदरील घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी पालम येथील आंबेडकर अनुयायीनी आज दि.११ डिसेंबर रोजी पालम शहर बंद चे अहवान केले होते या अहवानास शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत पालम शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले.
या दरम्यान सदरील घटनेचा निषेध करण्यासाठी शहरासह तालुक्यातील आंबेडकर अनुयायी एकत्र जमून बौध्द विहारापासून तहसील कार्यालया पर्यंत मोर्चा काढून संविधान बचाव संदर्भात घोषणा देत व आरोपीस कठोर शासन करावं या साठी आक्रोश दाखवत तहसीलदार यांना निवेदन दिले.


सदरील निवेदनात परभणी शहरातील मध्यवर्ती भागात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळील प्रतिकात्मक संविधान प्रतिमेची भर दिवसा तोडफोड,विटंबना करणे हे भारतीय नागरिकांसाठी अत्यंत दुःखद व अतिशय निंदनीय असून सदर घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र मद्यपानाच्या नावाखाली आरोपींना सहज व हलक्यात न घेता सदर राष्ट्रद्रोही कृत्य करण्यामागे आरोपीचा उद्देश काय आहे, याचा सर्वोच्च तपास होणे अत्यंत गरजेचे आहे अशी मागणी करत, या सदर देशद्रोही घटनेच्या निषेधार्थ पालम शहर बंद ठेवण्यात येत असून तसेच यापुढे अशा राष्ट्रद्रोही घटनांना राज्यात व देशात आळा घालण्यासाठी आरोपीला कठोरात कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी निवेदणाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी पालम शहरासह तालुक्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी आंबेडकर अनुयायी, बहुजन समाज बांधव, व महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.या दरम्यान पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

राजकीय, विदर्भ

विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे तमाम जनतेचे लक्ष !

तालुक्यातील तमाम जनतेच्या नजरा २३ तारखेच्या वणी विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलेल्या आहे.
वणी विधानसभेच्या निवडणुकीत बारा उमेदवार राजकीय भविष्य आजमावणार आहे. यात भाजपचे संजीव रेड्डी बोदकुरवार, शिवसेना (उबाठा) चे संजय देरकर, अपक्ष संजय खाडे, मनसेचे राजू उंबरकर,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अनिल हेपट, वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र निमसटकर, बहुजन समाज पार्टीचे अरूण कुमार खैरे, अपक्ष हरीष पाते, अपक्ष केतन पार्खी, अपक्ष नारायणन गोडे, अपक्ष निखिल ढुरके, अपक्ष राहुल आत्राम, यांचा समावेश आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या मागिल पाच तारखेनंतर विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून समावेश असणार्या उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत प्रचार जोमात केला. बारा उमेदवार पैकी चार उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर घर टू घर प्रचार केला. शेवटच्या क्षणापर्यंत अधिकाधिक मते स्वताच्या बाजूने पारड्यात कशी पाडता येतील प्रचारातून प्रयत्न झालेले पाहायला मिळाले. पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी आप आपल्या परीने जमेल तसे प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. २० तारखेला सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आणि सायंकाळी ६ वाजता मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसभा क्षेत्रात ७६.८८% टक्के मतदान झाल्याचे समजते. मात्र तालुक्यात त्यानंतर विजयाची माळ कुणाच्या गळ्यात या अंदाजाला सुरुवात झाली. अनेकांकडून हा निवडून येईल तो निवडून येईल अशा अंदाज वर्तवीण्याला सुर्वात झाली. काहींनी महायुतीचा उमेदवार तर काहींनी महा विकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तालुक्यात काही मनसे समर्थक कार्यकर्त्यांनी मनसेचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला. तर काहीनी संजय खाडे अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. खरं तर विधानसभा क्षेत्रातील जनतेने मतदानाचा कौल नेमका कुणाच्या बाजूने किती दिला हे उद्याच्या २३ तारखेच्या निकालात स्पष्ट होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र, राजकीय

खंडाळा तालुक्यात मोठ्या संख्येने ६८ % मतदान


अक्षराज : सुहास महांगरे

दि.२०, शिरवळ : वाई विधानसभा मतदारसंघात वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तीन तालुक्याचा समावेश असलेल्या खंडाळा मतदारसंघांमध्ये ६८ टक्के मतदान शांतते पार पडले या निवडणुकीत महायुतीचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मकरंद जाधव- पाटील आणि महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्यात सरळ लढत झाली. शिवसेना ( शिंदे गट ) अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या बंडखोरी केल्यामुळे निवडणुक चुरशीची झाली.

वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाल्यानंतर सर्व पक्षांचे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता ठिकठिकाणी कार्यकर्ते मतदारांना मतदान करण्यासाठी घेऊन येत होते. निवडणूक शांततेत पार पाडावी व जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई तहसीलदार सोनाली मेटकरी, महाबळेश्वर तहसीलदार तेजस्विनी पाटील, खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांनी सहकाऱ्यांसमवेत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. महायुतीचे उमेदवार आमदार मकरंद पाटील तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ,अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव व इतर उमेदवार यांनी काही मतदार केंद्रावर भेट देऊन मतदानाची माहिती घेतली. तसेच कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. यावेळी शिरवळ, पळशी , शिंदेवाडी, विंग, गुठाळे ,राजेवाडी, वडवाडी , हरतळी भाटघर तसेच पंचक्रोशी मध्ये तरुण वर्गाने आणि महिलांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त पणे मतदान केले. शनिवार दिनांक 23 रोजी वाई औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामा मध्ये मतमोजणी होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदान शांततेत पार पडले

ताज्या बातम्या, मुंबई /कोकण, राजकीय

आज २२ लाख मतदार ठरवणार उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद


अक्षराज : हरी कापसे
दि.२०, तलासरी :
काल दि.२० नोव्हेंम्बर२०२४ रोजी सकाळी ७वाजे पासून ते सायंकाळी६वाजेपर्यंत मतदान केंन्द्रावर मतदान करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली.जिल्ह्यातील सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सोमवारी संध्याकाळी ५वा.संपली व मतदारांशी संपर्क व भेटीगाठी सुरु झाली. यावेळी पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात एकूण ५३उमेदवार रिंगणात उभे आहेत.त्यात डहाणू मतदार संघात-८, विक्रमगड मतदार संघात-११, पालघर मतदार संघात-९,बोईसर मतदारसंघात-६ नालासोपारा मतदारसंघात-१२ तर वसई मतदारसंघात-७ असे ५६ उमेदवार रिंगणात उभे आहे.

विनोद मेढा यांचा विजय निश्चित अती लोक प्रियतेमुळे मतदारांचे मत
विनोद मेढा यांचा विजय निश्चित अती लोक प्रियतेमुळे मतदारांचे मत….

२२ लाख ९२ हजार ६६मतदार आहेत. हे एवढे मतदार ठरविणार आजच्या निवडणुकीत उमेवारांचे भवितव्य मतदान पेटीत डहाणूत विनोद निकोले समोर भाजपा-महायुतीचे युवा कणखर नेतृत्व सुशिक्षित मनमिळावू विनोद मेढा यांना मतदारांकडून अधिक लोकप्रियता दिसून आल्याने १०१% निवडून येण्याची शक्यता दिसून आली. त्यात निवडणुकीच्या मतदाना साठी अवघा एक दिवस शिल्लक राहिला असतांना डहाणू विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार (बविआ)सुरेश पाडवी यांना निवडणूक रिंगणात निवडून येण्याची शक्यता नसल्याने निवडणुकीत मते खाण्यापेक्षा योग्य उमेदवाराला मते मिळावी यासाठी यांनी पुन्हा भाजपाचे जिल्ह्याध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. सुरेश पाडवी यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केल्याने भाजपा उमेदवाराला अधिक मते मिळून मतांची टक्केवारी वाढतांना दिसेल व विनोदजी मेढा यांचा विजय निश्चित झाला आहे. तर बविआ पक्षाला मोठा धक्का बसल्याची चर्चा दिसली. यावेळी तलासरीत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान झाल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या, मुंबई /कोकण, राजकीय

कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांचा वचननामा जाहीर

अक्षराज: विनोद वास्कर
दि. १८, कल्याण( ठाणे) :
कल्याण ग्रामीणचे विधानसभेचे मनसेचे उमेदवार प्रमोद रतन पाटील यांना हक्काचा राजू दादा म्हणून ओळखले जातात. हाच हक्काचा माणूस आज पुन्हा एकदा कल्याण ग्रामीण विभागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून आमदारकी लढवत आहे. मागच्या वेळी कल्याण ग्रामीण विभागातून विधानसभेतून निवडून आले होते. राजू पाटील यांनी आमदार म्हणून पदभार स्वीकारताच आपल्या माय भगनींच्या सुरक्षेसाठी सर्वप्रथम शक्ती कायदा यावा यासाठी आग्रही भूमिका घेतली.आणि आता ते विधेयक सहमत होऊन लवकरच तो कायदा होईल.आगरी भूमिपुत्रांच्या जमिनीवर उभे राहत असलेले नवी मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचे नाव मिळावे यासाठी भूमिपुत्रांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष केला. याबाबत दिल्लीत झालेल्या बैठकीला उपस्थित राहून या मुद्द्यावर आपल्या समाजाचे नेतृत्व केले. कल्याण ग्रामीण विभागात असलेल्या २७ गावातील विकासाला गती दिली. तसेच १४ गाव विकास समितीसह त्यांच्या हक्कासाठी सरकारशी झगडले. स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारे इथल्या विभागावर करण्यात येणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. कोरोनाच्या महामारीत देखील आमदार राजू दादा पाटील आणि त्यांचे मनसे सहकारी रस्त्यावर उतरून लढत होते.आमदार राजू दादा पाटील यांनी पाच वर्षात कल्याण ग्रामीण भागामध्ये जे काही काम केलं आहे ते नागरिकांनी पाहिलं आहे. राजू दादा पाटील यांनी एक लोक प्रतिनिधी म्हणून नाही तर एक तुमचा भाऊ व स्थानिक भूमिपुत्र म्हणून त्यांनी कार्य पार पाडली आहेत. ही माती, हा विभाग म्हणजे माझी मातृभूमी, माझी कर्मभूमी आहे. म्हणूनच कल्याण ग्रामीण बदलत आणि सर्वांच्या साथीने अधिक विकसित होत जाणार असा विश्वास आमदार राजू पाटील यांना आहे…

मा. आमदार राजू दादा पाटील यांनी दिवा डंपिंग, भंडारी डम्पिंग आणि डायघर कचरा प्रकल्प अशा सर्वच आंदोलनात समाज बांधवांसोबत लढा दिला. २७ गावाची स्वतंत्र नगरपालिका असावी यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि स्थानिकांसोबत अविरत लढा दिला. १४ गावाचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समावेश करून घेण्यासाठी सर्व पक्षीय विकास समिती व स्थानिकांसोबत खांदाला खांदा लावून विधिमंडळापर्यंत लढा दिला व या गावाचा नवी मुंबईमध्ये समावेश केला. हेदुटणे आणि उत्तर शिव गुरुचरण जागेच्या अन्यायकारक अधिग्रहणा विरोधात समाज बांधवांसोबत आंदोलन केले. सोनार पाडा येथील अन्यायकारक अधिग्रहण थांबून भूमिपुत्रांना अपेक्षित न्याय मिळवून दिला. आगरी वधू वर सामूहिक विवाह सोहळा संमती मार्फत आगरी समाजातील मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. प्रत्येक वधू वरास प्रत्येकी एक लाखाचा धनादेश त्यांनी दिला आहे. यावर्षी तीन जिल्ह्यांमध्ये हा सोहळा राबवला जाणार आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ५० जोडपांचे विवाह झाला तरी त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाईल. असे आमदार राजू पाटील यांनी जाहीर केले आहे. या सर्व कामामुळेच आगरी समाजातील जनतेने मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी वचननामा सुद्धा त्यांनी जाहीर केला आहे. कल्याण ग्रामीण मधल्या जनतेसाठी त्यांनी वचननामा मध्ये काय जाहीर केले आहे ते पुढील प्रमाणे
स्वर्गीय रतनबुवा पाटील आगरी कोळी व वारकरी भवनाचे दिनांक १२ फेब्रुवारी २०२८ रोजी लोकार्पण करणार, २७ गावांसाठी असलेली अमृत पाणी योजना २०१९ ते आता आजपर्यंत ८५% पूर्ण झाली ती येत्या मे पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू होणार, मुंबई महाराष्ट्रकरता रेल्वेचा स्वतंत्र बोर्ड असावा यासाठी पाठपुरवठा करणार, दिवा व काटई या दोन नवीन पोलीस स्टेशनच्या निर्मितीसाठी पाठपुरवठा सुरू असून लवकरच पूर्ण करणार, कल्याण डोंबिवली चा हक्काचा १४० एम एल डी अतिरिक्त पाणी कोठा मिळवून देणार, दिवा पाणीपुरवठा रिमोल्डिंग योजना व दिवा पश्चिमेचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी थूर लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरवठा करणार, कल्याण शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कल्याण फाटा महापे उड्डाणपूल तातडीने पूर्ण करून या रस्त्याला पर्यायी रस्ते तयार करण्यासाठी पाठपुरावा करणार, आयरे गाव विभागाला थेट रिंगरूटला जोडण्यासाठी पाठपुरावा करणार, म्हाताडी बुलेट ट्रेन स्टेशन परिसरात दळणवळण्यासाठी रस्त्याचे जाळे विकसित करण्यासाठी पाठपुरावा करणार, कोपर, दिवा, मुंब्रा, रेतीबंदर रेल्वे समांतर रस्त्यासाठी पाठपुरावा करणार, दिवा विभागातील महत्त्वाचे डि.पी रस्ते तयार करण्यासाठी पुढाकार घेऊन डि.पी लगतच्या जागा आर झोन करण्यासाठी पाठपुरावा करणार, खरवलीदेवी मंदिर रस्त्यासाठी वन विभागाकडे पाठपुरावा करणार, नेवाली चौकात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन उड्डाणपूल मंजूर करून घेणार, दिवा पूर्व पश्चिम रेल्वे उड्डाणपुलाबाबतच्या अडचणी सोडवून तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार, एमआयडीसी मधील धोकादायक केमिकल कंपन्यांना बेल आऊट पॅकेज देऊन दुसरीकडे स्थलांतरित करून त्यांच्या जागी आय टी हब व ग्रोथ सेंटर उभारून त्या ठिकाणी स्थानिकांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार, क्लस्टर बाबत भूमिपुत्र व रहिवाशांच्या मागण्या सरकार दरबारी लावून सुटसुटीत व सर्वमान्य धोरण आणणार, निळजे, देसाई, खार्डी खाडी किनारी संरक्षक भित बांधून जॉगिंग ट्रॅक, गणेश घाट, गार्डन व पक्षी निरीक्षण केंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करणार, मतदार संघातील सर्व सरकारी शाळेचे एकच आदर्श मॉडेल तयार करण्यासाठी आराखडा तयार करीत आहेत.१४ गावासाठी अद्ययावत दवाखाना तयार करण्यासाठी पाठपुरावा करणार, कल्याण ग्रामीण क्षेत्रात महिलांना व बालकांसाठी स्वातंत्र्य दवाखान्यासाठी पाठपुरावा सुरू आहे तो येत्या काळात मार्गी लावणार, डायघर कचरा प्रकल्प विरोधात स्थानिकांसोबत राहणार, ठाणे महानगरपालिकेने आगासन बेतवडे व म्हाताडी गावातील भूमिपुत्रांच्या जागेवर टाकलेले सरसकट व अन्याधारक आरक्षण रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार, मतदारसंघातील सर्व नोंदणी युक्त बौद्ध विहार सुशोभित करणार, टोरंट विरोधी आंदोलनात भूमिपुत्रांसोबत राहिलो व राहणार, मतदार संघातील सर्व बचत गटाचे सबलीकरण करणार,२७ गावातील भूमिपुत्रांच्या जागेवर गरजेपोटी बांधिली घरे उल्हासनगरच्या धर्तीवर नियमित करण्यासाठी पाठपुरावा करणार, असे आश्वासन कल्याण ग्रामीण जनतेला वचननामामध्ये मा.आमदार राजू पाटील यांनी दिले आहे.

Scroll to Top