कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांचा वचननामा जाहीर

Spread the love

अक्षराज: विनोद वास्कर
दि. १८, कल्याण( ठाणे) :
कल्याण ग्रामीणचे विधानसभेचे मनसेचे उमेदवार प्रमोद रतन पाटील यांना हक्काचा राजू दादा म्हणून ओळखले जातात. हाच हक्काचा माणूस आज पुन्हा एकदा कल्याण ग्रामीण विभागातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून आमदारकी लढवत आहे. मागच्या वेळी कल्याण ग्रामीण विभागातून विधानसभेतून निवडून आले होते. राजू पाटील यांनी आमदार म्हणून पदभार स्वीकारताच आपल्या माय भगनींच्या सुरक्षेसाठी सर्वप्रथम शक्ती कायदा यावा यासाठी आग्रही भूमिका घेतली.आणि आता ते विधेयक सहमत होऊन लवकरच तो कायदा होईल.आगरी भूमिपुत्रांच्या जमिनीवर उभे राहत असलेले नवी मुंबई अंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचे नाव मिळावे यासाठी भूमिपुत्रांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष केला. याबाबत दिल्लीत झालेल्या बैठकीला उपस्थित राहून या मुद्द्यावर आपल्या समाजाचे नेतृत्व केले. कल्याण ग्रामीण विभागात असलेल्या २७ गावातील विकासाला गती दिली. तसेच १४ गाव विकास समितीसह त्यांच्या हक्कासाठी सरकारशी झगडले. स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारे इथल्या विभागावर करण्यात येणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. कोरोनाच्या महामारीत देखील आमदार राजू दादा पाटील आणि त्यांचे मनसे सहकारी रस्त्यावर उतरून लढत होते.आमदार राजू दादा पाटील यांनी पाच वर्षात कल्याण ग्रामीण भागामध्ये जे काही काम केलं आहे ते नागरिकांनी पाहिलं आहे. राजू दादा पाटील यांनी एक लोक प्रतिनिधी म्हणून नाही तर एक तुमचा भाऊ व स्थानिक भूमिपुत्र म्हणून त्यांनी कार्य पार पाडली आहेत. ही माती, हा विभाग म्हणजे माझी मातृभूमी, माझी कर्मभूमी आहे. म्हणूनच कल्याण ग्रामीण बदलत आणि सर्वांच्या साथीने अधिक विकसित होत जाणार असा विश्वास आमदार राजू पाटील यांना आहे…

मा. आमदार राजू दादा पाटील यांनी दिवा डंपिंग, भंडारी डम्पिंग आणि डायघर कचरा प्रकल्प अशा सर्वच आंदोलनात समाज बांधवांसोबत लढा दिला. २७ गावाची स्वतंत्र नगरपालिका असावी यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि स्थानिकांसोबत अविरत लढा दिला. १४ गावाचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समावेश करून घेण्यासाठी सर्व पक्षीय विकास समिती व स्थानिकांसोबत खांदाला खांदा लावून विधिमंडळापर्यंत लढा दिला व या गावाचा नवी मुंबईमध्ये समावेश केला. हेदुटणे आणि उत्तर शिव गुरुचरण जागेच्या अन्यायकारक अधिग्रहणा विरोधात समाज बांधवांसोबत आंदोलन केले. सोनार पाडा येथील अन्यायकारक अधिग्रहण थांबून भूमिपुत्रांना अपेक्षित न्याय मिळवून दिला. आगरी वधू वर सामूहिक विवाह सोहळा संमती मार्फत आगरी समाजातील मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. प्रत्येक वधू वरास प्रत्येकी एक लाखाचा धनादेश त्यांनी दिला आहे. यावर्षी तीन जिल्ह्यांमध्ये हा सोहळा राबवला जाणार आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये ५० जोडपांचे विवाह झाला तरी त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये दिले जाईल. असे आमदार राजू पाटील यांनी जाहीर केले आहे. या सर्व कामामुळेच आगरी समाजातील जनतेने मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी वचननामा सुद्धा त्यांनी जाहीर केला आहे. कल्याण ग्रामीण मधल्या जनतेसाठी त्यांनी वचननामा मध्ये काय जाहीर केले आहे ते पुढील प्रमाणे
स्वर्गीय रतनबुवा पाटील आगरी कोळी व वारकरी भवनाचे दिनांक १२ फेब्रुवारी २०२८ रोजी लोकार्पण करणार, २७ गावांसाठी असलेली अमृत पाणी योजना २०१९ ते आता आजपर्यंत ८५% पूर्ण झाली ती येत्या मे पर्यंत टप्प्याटप्प्याने सुरू होणार, मुंबई महाराष्ट्रकरता रेल्वेचा स्वतंत्र बोर्ड असावा यासाठी पाठपुरवठा करणार, दिवा व काटई या दोन नवीन पोलीस स्टेशनच्या निर्मितीसाठी पाठपुरवठा सुरू असून लवकरच पूर्ण करणार, कल्याण डोंबिवली चा हक्काचा १४० एम एल डी अतिरिक्त पाणी कोठा मिळवून देणार, दिवा पाणीपुरवठा रिमोल्डिंग योजना व दिवा पश्चिमेचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी थूर लाईनचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरवठा करणार, कल्याण शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कल्याण फाटा महापे उड्डाणपूल तातडीने पूर्ण करून या रस्त्याला पर्यायी रस्ते तयार करण्यासाठी पाठपुरावा करणार, आयरे गाव विभागाला थेट रिंगरूटला जोडण्यासाठी पाठपुरावा करणार, म्हाताडी बुलेट ट्रेन स्टेशन परिसरात दळणवळण्यासाठी रस्त्याचे जाळे विकसित करण्यासाठी पाठपुरावा करणार, कोपर, दिवा, मुंब्रा, रेतीबंदर रेल्वे समांतर रस्त्यासाठी पाठपुरावा करणार, दिवा विभागातील महत्त्वाचे डि.पी रस्ते तयार करण्यासाठी पुढाकार घेऊन डि.पी लगतच्या जागा आर झोन करण्यासाठी पाठपुरावा करणार, खरवलीदेवी मंदिर रस्त्यासाठी वन विभागाकडे पाठपुरावा करणार, नेवाली चौकात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन उड्डाणपूल मंजूर करून घेणार, दिवा पूर्व पश्चिम रेल्वे उड्डाणपुलाबाबतच्या अडचणी सोडवून तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार, एमआयडीसी मधील धोकादायक केमिकल कंपन्यांना बेल आऊट पॅकेज देऊन दुसरीकडे स्थलांतरित करून त्यांच्या जागी आय टी हब व ग्रोथ सेंटर उभारून त्या ठिकाणी स्थानिकांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणार, क्लस्टर बाबत भूमिपुत्र व रहिवाशांच्या मागण्या सरकार दरबारी लावून सुटसुटीत व सर्वमान्य धोरण आणणार, निळजे, देसाई, खार्डी खाडी किनारी संरक्षक भित बांधून जॉगिंग ट्रॅक, गणेश घाट, गार्डन व पक्षी निरीक्षण केंद्र उभारण्यासाठी पाठपुरावा करणार, मतदार संघातील सर्व सरकारी शाळेचे एकच आदर्श मॉडेल तयार करण्यासाठी आराखडा तयार करीत आहेत.१४ गावासाठी अद्ययावत दवाखाना तयार करण्यासाठी पाठपुरावा करणार, कल्याण ग्रामीण क्षेत्रात महिलांना व बालकांसाठी स्वातंत्र्य दवाखान्यासाठी पाठपुरावा सुरू आहे तो येत्या काळात मार्गी लावणार, डायघर कचरा प्रकल्प विरोधात स्थानिकांसोबत राहणार, ठाणे महानगरपालिकेने आगासन बेतवडे व म्हाताडी गावातील भूमिपुत्रांच्या जागेवर टाकलेले सरसकट व अन्याधारक आरक्षण रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार, मतदारसंघातील सर्व नोंदणी युक्त बौद्ध विहार सुशोभित करणार, टोरंट विरोधी आंदोलनात भूमिपुत्रांसोबत राहिलो व राहणार, मतदार संघातील सर्व बचत गटाचे सबलीकरण करणार,२७ गावातील भूमिपुत्रांच्या जागेवर गरजेपोटी बांधिली घरे उल्हासनगरच्या धर्तीवर नियमित करण्यासाठी पाठपुरावा करणार, असे आश्वासन कल्याण ग्रामीण जनतेला वचननामामध्ये मा.आमदार राजू पाटील यांनी दिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top