कार्यालयीन वेळेत कर्मचारी खेळताय जुगार !
अक्षराज : विनोद गिरी
दि.०३, डोंबीवली (ठाणे) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या 10/ई प्रभाग मधील काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत दावडी गाव, रीजन्सी येथील कार्यालय परिसरात पैज लावत रोज जुगार खेळत असतात अशी माहिती भेटल्यानंतर सदर ठिकाणी जाऊन बघितले असता माहितीमध्ये सत्यता आढळून आली.
या वेळी सदर ठिकाणी जीपीएस कॅमेऱ्याच्या सहाय्याने व्हिडिओ काढून सदर व्हिडिओ प्रभाग सहा. उपायुक्त 10/ई साहेबांना पाठवली आहे. त्यावर सदर सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे, पण या जुगार खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांची बदली होऊन बऱ्याच कालावधी उलटला आहे.
परंतु राजकीय वरदहस्त असल्यामुळे सदर कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी हजर होत नाही आणि तेच कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांना घेऊन इथे जुगार खेळत बसलेले असतात, प्रभागामध्ये कार्य करण्यासाठी कर्मचारी अपुरे आहेत अशी माहिती दिली जाते. परंतु जर कर्मचारी अपुरे असतील तर हे कर्मचारी बसून कार्यालईन वेळेत जुगार कसे काय खेळत आहेत? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होतो. ज्या कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे आणि बदली झालेल्या ठिकाणी हजर होत नाही अशा कर्मचाऱ्यांना कृपया तात्काळ सेवेतून निलंबित करण्याचे आदेश देऊन अशा बेजबाबदार कर्मचारी वर्गांवर व यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी, यांच्यावर सुद्धा शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी जेणेकरून अशा घटना इतर ठिकाणी घडणार नाहीत.