खबरदार ! रेल्वे गाड्यांवर रंगाचे फुगे मारल्यास पोलिसांकडून होणार सक्त कारवाई…

Spread the love

अक्षराज : विश्वनाथ शेनोय
दि.१३, डोंबिवली (ठाणे) :
डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे व ठाण्यातील अधिकारी अंमलदार यांनी होळी सणाच्या अनुषंगाने शाळेत जाऊन जनजागृती कार्यक्रम घेतले. त्यासोबत दि.१२ रोजी डोंबिवली रेल्वे स्टेशन लगत असलेले शास्त्रीनगर झोपडपट्टी ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बनकर, तायडे आणि तीन अंमलदार यांनी तिथल्या नागरिकांना दि.१३ रोजी होळी आणि दि.१४ रोजी धुलीवंदन सण साजरा करताना रेल्वे गाड्यांवर कोणत्याही पाण्याच्या भरलेल्या पिशव्या, फुगे किंवा तत्सम पदार्थ फेकू नये.

यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये दरवाजावर उभे असलेले व खिडकी बसलेल्या प्रवाशांना गंभीर इजा होऊ शकतात व कायमस्वरूपी अपंगत्व सुद्धा येऊ शकते. आपले सण कोणालाही कोणत्याही प्रकारच्या इजा न होता गुण्या गोविंदाने आपल्या विभागात मोकळ्या जागेवर साजरे करावे आणि हानीकारक रंगाचे पदार्थ अंगावर लावून नाये. रेल्वे गाड्यांवर कोणतेही पदार्थ, दगड पाण्याच्या पिशव्या, फुगे मारून इतर तत्सम पदार्थ फेकून इजा करणाऱ्या इसमावर १२५,१२५(a) १२५(b)बीएन एस, १५२भारेका अन्वय कारवाई करण्यात येईल, यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. रेल्वे ट्रॅकवर कोणतही अनुचित प्रकार निदर्शनात आल्यास रेल्वे पोलीस हेल्पलाइन १५१२ या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असेही आवाहन डोंबिवली लोहमार्ग पोलीस यांच्याकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!