खुशखबर ! पारनेर आगारात ५ नवीन बसेस दाखल

Spread the love

पारनेर आगारात ५ नवीन बसेस दाखल…

आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते नवीन बसचे केले लोकार्पण

अक्षराज : वसंत रांधवण
दि.१८, पारनेर (अहिल्यानगर) :
राज्य परिवहन महामंडळाच्या पारनेर आगारात अत्याधुनिक पाच नवीन एसटी बस दाखल झाल्या आहेत. या नवीन बसचे पूजन व लोकार्पण आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते पार पडले.
मागिल काही दिवसापूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची आमदार काशिनाथ दाते यांनी मुंबई येथे भेट घेऊन पारनेरच्या राज्य परिवहन विभागातील विविध समस्यांवर चर्चा केली होती. पारनेर आगारास २५ नवीन बसेसची उपलब्धता करून देण्याची मागणी केली होती. मंत्री महोदयांनी तत्काळ २० बसेस प्राथमिक स्तरावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आज पारनेर अगारास त्यातील पाच बसेस उपलब्ध झालेल्या आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी आमदार काशिनाथ दाते यांनी सपत्नीक नवीन बसमधून प्रवास केला यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी व कर्मचारी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी आमदार काशिनाथ दाते म्हणाले, पुढील काळात पारनेरमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता याच्याबरोबर मतदार संघातील नागरिक विशेषतः शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ज्यादा एसटी बस शासनाकडून मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला आहे. लवकरच ज्यादा एसटी बस मिळतील. शासकीय कामकाजासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्या तुलनेत पारनेर आगारात बसची संख्या कमी होती, त्यात काही बस जुन्या झाल्यामुळे त्या वारंवार बंद पडत असून, काही बस स्क्रॅप करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे एसटी प्रशासनाच्या बसच्या वेळा आणि संचलनाचे नियोजन करताना चांगलीच तारेवरची कसरत होते. मे महिन्याच्या सुरुवातीला पारनेर एसटीच्या ताफ्यात नवीन ५ बस दाखल झाल्या आहेत, तर पुढील काळात आणखीन ५ बस (लालपरी) दाखल होणार असल्याने प्रवाशांनी आणि एसटी प्रशासनाने समाधानाचा सुस्कारा सोडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!