गांजा अंमली पदार्थ विकणा-या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश…
अक्षराज : प्रतिनिधी
दि.२८, कल्याण (ठाणे) : पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे यांनी अवैध धंदयावर कठोर कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. सदर आदेशाचे अनुषंगाने मा. पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी अवैध धंदयावर कारवाई करणेकरिता विशेष पथक स्थापन करणेबाबत मार्गदर्शन केले होते. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. संजय जाधव साो, यांचे आदेशाने पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण, अतुल झेंडे यांनी परिमंडळ ३ कल्याण स्तरावर अवैध धंदयावर कारवाई करणेकरिता विशेष पोलीस पथक स्थापन केलेले आहे.सदर विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण व पोलीस पथक दिनांक २७/०१/२०२५ रोजी संयुक्तरित्या खाजगी वाहनाने गस्त करीत असताना दुपारी १२:१५ वा. लक्ष्मण रेषा, रेल्वे पटरीच्या बाजुला, आयरेगांव, डोंबिवली पूर्व येथे एक इसम संशयास्पदरित्या लपण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांस पळून जाताना पकडले.
सदरच्या इसमाचे ताब्यातील प्लास्टीकचे पिशवीची झडती घेतली असता, त्यामध्ये ७ किलो, ०६६ गॅम वजनाचा १,४०,०००/-रुपये किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला असुन, आरोपीचे नांव किरण हर्षदराव शहा, वय ४२ वर्षे, व्यवसाय चालक, रा. रुम नं. ए/२२, मनोहर भगत बिल्डींग, तुकारामनगर, भगतवाडी, डोंबिवली पुर्व असे आहे. सदर इसमास पंचासमक्ष ताब्यात घेवुन त्याचे ताब्यात मिळुन आलेला गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला असुन, त्याचेविरुद्ध डोंबिवली पोलीस स्टेशन गु.रनि. नं. १८७/२०२५, गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन १९८५ चे कलम ८(c), २० (b) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन, आरोपी यास सदर गुन्हयात अटक करण्यात आले आहे. सदर आरोपीचे ताब्यात मिळुन आलेला गांजा अंमली पदार्थ हा त्याने कोठुन व कोणाकडुन आणला आहे, तसेच तो येथे कुणाला विक्री करणार आहे, याबाबत अधिक तपास सुरू आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक/गोरखनाथ गाडेकर, नेम. डोंबिवली पोलीस ठाणे हे करित आहेत.