डायघर गावासाठी भूमिपुत्र एकवटले, सहाय्यक आयुक्तांना घातला घेराव
ठाणे जिल्ह्यातील ५० गावातील संघटना एकत्र येऊन दिवा प्रभाग समितीला दिली धडक;
जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांना दिले निवेदन
अक्षराज : विनोद वास्कर
दि.२५, डायघर गाव (ठाणे) :
ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील सर्व संघटनांनी दिवा प्रभाग समितीला धडक दिली. सहाय्यक आयुक्तांना तसेच सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना घेराव घालून जॉब विचारले, डायघर गावातील ग्रामस्थांच्या घरात पाणी शिरल्यामुळे पंचक्रोशीतील ५० गावातील संघटना एकत्र येऊन सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि भूमिपुत्रांनी अधिकाऱ्याला घेराव घालून जाब विचारला आहे. गेल्या वर्षी सुद्धा निवेदन दिले होते. या वर्षी सुद्धा निवेदन देऊन अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे भूमिपुत्रांनी आपला संताप व्यक्त केला आहे. जर नागरिकांच्या समस्या तुम्हाला सोडवता येत नसतील तर मग तुम्ही या खुर्चीवर बसतात कशाला, फुकटचा पगार घेतात कशाला, मंगळवार, दिनांक २६ ऑगस्ट २०२५ पर्यंत विकसित यांनी नैसर्गिक नाले बंद केले आहेत ते खुले करून द्या नाहीतर आम्ही आगरी समाज काय आहे ते तुम्हाला दाखवून देऊ असा इशारा अधिकाराला देऊन आले आहेत. जर का न्याय मिळाला नाही तर बिल्डरच्या विरोधात आंदोलन करणार आणि दिवा प्रभाग समितीला टाले ठोकणार असा इशारा महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे सचिव ह.भ.प. संतोष केणे आणि भूमिपुत्रांनी इशारा दिला.
भूमिपुत्रांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना दिले निवेदन
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांना सुद्धा जनता दरबारात ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील सर्व संघटनाच्या वतीने निवेदन देण्यात आले. गणेश नाईक साहेबांनी ताबडतोब नयाब तहसीलदार ठाणे यांना फोन लावले. ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिले. नागरिकांना नुकसान भरपाई द्या. तसेच विकासित यांनी जे नाले बंद केले आहे ते खुले करून द्या असे आदेश गणेश नाईक साहेब यांनी दिले.स्वतः नयाब तहसीलदार नागरिकांच्या घरी पंचनामासाठी येणार आहेत. डायघर गावचे शशिकांत पाटील यांच्या कुटुंबांना दोन ते तीन दिवस टेरेसवर राहावे लागले. महापुराचे पाणी घरात शिरल्यामुळे भरपूर नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी सुद्धा भरपाई मिळाली नव्हती. यावेळी तेरी प्रशासन त्यांना भरपाई देणार का? पाच वर्षे झाले प्रशासन काही दखल घेत नाही. आता तरी प्रशासनाचे डोळे उघडणार का?