डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते शुभारंभ

Spread the love

डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते शुभारंभ

अक्षराज : विश्वनाथ शेनोय 

दि.०७, ठाणे : रविवार दि.०६ रोजी विवियाना मॉल, ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे यांच्या हस्ते करण्यात आला. सदर डिजीटल वारी मध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मिडीयावरील व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंन्स्टाग्राम, X (ट्वीटर) व वेबसाईट या सोशल मिडीया चॅनल चे क्युआर कोड नागरिकांसाठी सुरू करण्यात आले. या कार्यक्रमास मराठी सिनेअभिनेता हार्दिक जोशी, मंगेश देसाई, गौरख मोरे आणि सिनेअभिनेत्री अक्षया देवधर हे देखील उपस्थित होते.पोलिसांच्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्ममुळे नागरिकांना त्वरित माहिती मिळणे व त्यांच्याशी संपर्क करणे शक्य होणार आहे. नागरिकांमध्ये जागरूकता वाढने तसेच गुन्हेगारांवर केलेल्या कारवाईची माहिती नागरिकापर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. पोलीस व जनतेत एकमेंकाप्रती विश्वास वाढण्यास तसेच हरवलेल्या व्यक्ती व गहाळ झालेल्या वस्तु शोधणे सदर सोशल मिडीया प्लॅटफार्मव्दारे शक्य होणार आहे. तसेच पोलीसांच्या सामाजिक उपक्रमांबद्दल नागरिकांना माहिती देणे, पोलीसांशी थेट संवाद साधणे हेदखील सदर सोशल मिडीया प्लॅटफॉर्मव्दारे शक्य होणार आहे.

सदर कार्यक्रमा दरम्यान सिनेअभिनेता हार्दिक जोशी, मंगेश देसाई, गौरव मोरे आणि सिनेअभिनेत्री अक्षया देवधर यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मिडीया चॅनल चे क्युआर कोड जास्तीत जास्त नागरीकांनी स्कॅन करून नागरिकांच्या काही तक्रारी अथवा अडचणी असल्यास ठाणे पोलीसांना तात्काळ कळवुन पोलीसांना सहकार्य करावे व पोलीसांशी कनेक्ट व्हावे असे ठाण्यातील जनतेला आवाहन केले. तसेच आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे यांनीही आपल्या भाषणात ठाणे पोलीस आयुक्तालयातील नागरिकांनी सदर क्युआर कोड स्कॅन करून आपल्या विविध अडचणी सोशल मिडीयाव्दारे पोलीसांना कळवाव्यात जेणेकरून पोलीसांना नागरिकांच्या अडचणींवर लवकर मात करणे शक्य होईल असे आवाहन केले.त्याचवेळी ठाणे पोलीस आयुक्तालयातील वाहतुकीसंदर्भात नागरिकांना काही अडचणी असल्यास किंवा मदत हवी असल्यास ठाणे वाहतुक शाखेने त्यांच्या १८ उपविभागांसाठह १८ हेल्पलाईन नंबर प्रसारित केले असून त्याचाही शुभारंभ या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला.

ठाणेनगर-८६५५६५४१७१, कळवा-८६५५६५४१७४, राबोडी-८६५५६५४१७२, मुंब्रा-८६५५६५४१७५, नौपाडा-८६५५६५४१७३, कोपरी-८६५५६५४१७६, वागळे-८६५५६५४१७७, भिवंडी-८६५५६५४१८०, कल्याण-८६५५६५४१८३, उल्हासनगर-८६५५६५४१८६, कापुरबावडी – ८६५५६५४१७८, कोनगांव-८६५५६५४१८१, डोंबिवली-८६५५६५४१८४, विठ्ठलवाडी-८६५५६५४१८७, कासारवडवली-८६५५६५४१७९, नारपोली-८६५५६५४१८२, कोळसेवाडी-८६५५६५४१८५, अंबरनाथ-८६५५६५४१८८

सदर हेल्पलाईन क्रमांकाचा नागरिकांनी वापर करून त्यावर वाहतुकीसंदर्भातल्या त्यांच्या अडचणी पोलीसांना कळवाव्यात असेही आवाहन कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी केले.

सदरचा उपक्रम यशस्वी होण्यासाठी उपस्थित सिनेअभिनेते, VAVO डिजीटल यांचे प्रतिनिधी, तसेच आशुतोष पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच सिनेअभिनेता श्रेयस तळपदे यांनी ठाणे पोलीस आयुक्लायलातील नागरिकांमध्ये वाहतुकीसंदर्भात जागरूकता निर्माण व्हावी याकरिता लघुसिनेमा तयार करण्यासाठी उत्स्फुर्त मदत केली आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सोशल मिडीयावरील उपरोक्त चॅनलचे क्युआर कोड स्कॅन करून जास्तीत जास्त नागरिकांनी ठाणे पोलीसांशी जोडण्याबाबत ठाणे पोलीसांमार्फत आव्हान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
error: Content is protected !!