ताल बार अँड रेस्टॉरंटवर धाड ! २३ जणांवर गुन्हा दाखल…
अक्षराज : भानुदास गायकवाड
दि.०३, कल्याण (ठाणे ) : महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीतील ताल बार अँड रेस्टॉरंटवर, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ कल्याण यांच्या आदेशाने, गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या सहाय्याने रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. ही कारवाई मध्यरात्री १:४० वाजेच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी तपासणी केली असता संबंधित बार विहित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरु असल्याचे आढळून आले. तसेच, तेथे उपस्थित ६ महिला सिंगर या तोडक्या कपड्यांत अश्लील हावभाव करत डान्स करत असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ पंचांच्या उपस्थितीत ‘ई-साक्ष’ अॅपद्वारे पंचनामा करण्यात आला.
(हे वाचले का ?👇🏻)
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर…
https://aksharaj.in/नाशिकच्या-सिंहस्थ-कुंभमे
या प्रकरणी एकूण १७ पुरुष व ६ महिला सिंगर अशा एकूण २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, महात्मा फुले पोलीस ठाण्यात गु. रजि. क्र. ६३६/२०२५ भारतीय दंड संहितेच्या कलम २९६, ५४, ३(५) अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान एकूण रु. २८,९८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागरिकांसाठी पोलिसांनी केले आवाहन…
आपल्या परिसरात गल्लीबोळात, रस्त्यालगत कोणतेही बार, रेस्टॉरंट, हॉटेल किंवा वाईन शॉप असेल आणि त्यांचा त्रास होत असेल – उदा. उशिरापर्यंत चालू ठेवणे, रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंगमुळे ट्रॅफिक अडथळा, अश्लील वर्तन, महिलांचा तोकड्या कपड्यात वावर इत्यादी – तर आपण कल्याण पश्चिम परिमंडळ ०३ च्या अधिकाऱ्यांना भेटून तक्रार नोंदवू शकता.
दैनिक अक्षराज ०३ जून २०२५
पेपर येथे वाचा व फॉरवर्ड करून सहकार्य करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://epaper.aksharaj.in/view/213/daily-aksharaj-03-june-2025#
आपली तक्रार गोपनीय ठेवली जाईल. अशा प्रकारच्या अनैतिक व अवैध कृत्यांचा आपल्या समाजावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे अशा प्रकारांवर वेळेत कारवाई होणे आवश्यक आहे.